Nagpur Ganeshotsav | नागपुरात गणेशोत्सवासाठी 'एक खिडकी' योजना; परवानग्या ऑनलाइन देण्याचे महापौरांचे निर्देश

मनपा, पोलीस, वाहतूक विभाग, नासुप्र आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाने समन्वयाने काम करावे
One Window Scheme Nagpur
गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत बोलताना महापौर निता ठाकरेPudhari
Published on
Updated on

One Window Scheme Nagpur

नागपूर : आगामी गणेशोत्सव निर्विघ्न, सुरक्षित आणि उत्साहात पार पडावा यासाठी गणेशोत्सव मंडळांना आवश्यक सर्व परवानग्या आणि ना हरकत प्रमाणपत्रे 'एक खिडकी' योजनेद्वारे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौर निता ठाकरे यांनी दिले. तसेच मंडळांच्या कार्यकर्त्यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी मनपा, पोलीस, वाहतूक विभाग, नासुप्र आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाने समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात गुरुवारी गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मनपा आयुक्त डॉ. विपीन, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

One Window Scheme Nagpur
Nagpur News | लॉकअपमध्ये पिझ्झा, मऊ गादीची मागणी; अल्पवयीनवरील अत्याचारप्रकरणातील आरोपीच्या वर्तनाने पोलिसही हैराण

महापौर निता ठाकरे यांनी सांगितले की, मनपा मुख्यालयासह सर्व झोन कार्यालयांमध्ये गणेश मंडळांना परवानग्या देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पोलीस, वाहतूक विभाग आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे कर्मचारी झोन स्तरावर उपलब्ध राहिल्यास मंडळांना वारंवार कार्यालयांचे फेरे मारावे लागणार नाहीत. गणेशमूर्ती खरेदीसाठी महाल परिसरात होणारी गर्दी कमी करण्यासाठी शहरातील इतर मैदानांवरही मूर्ती विक्रीची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

ड्रोन आणि जीपीएसद्वारे गर्दीवर नियंत्रण

सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर यांनी विसर्जनस्थळांवर उंच टॉवर उभारून ड्रोनद्वारे गर्दीवर नजर ठेवण्याचा प्रस्ताव मांडला. ड्रोनचे थेट नियंत्रण कक्षाशी जोडल्यास वाहतूक व गर्दी व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच ऑनलाइन मंजुरीनंतरही स्वाक्षऱ्यांसाठी होणारा विलंब टाळण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी विसर्जनासाठी जाणाऱ्या वाहनांवर जीपीएस प्रणालीचा प्रायोगिक वापर करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यामुळे वाहतूक कोंडीची माहिती तत्काळ मिळून पोलिसांना नियोजन करणे सोपे होणार आहे.

One Window Scheme Nagpur
Nagpur News : कर्जाच्या आमिषाने महिलांच्या नावावर ७.६८ कोटींचे व्यवहार; मुख्य आरोपी अटकेत

आगीपासून संरक्षण आणि ध्वनीप्रदूषणावर भर

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गणेशोत्सव मंडळांना सर्व आवश्यक परवानग्या वेळेत मिळतील, असे सांगितले. मोठ्या मंडळांनी आगीपासून संरक्षणासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, तसेच गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि ध्वनीप्रदूषण रोखण्यावर विशेष भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

महापालिकेकडून विशेष सुविधा

  • गणेशोत्सवादरम्यान मनपाकडून पुढील सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत :

  • गणेश मंडळांसाठी ऑनलाइन परवानगी प्रणाली.

  • सर्व झोनमध्ये 'एक खिडकी' योजनेतून पोलीस, वाहतूक, अग्निशमन आणि धर्मादाय विभागाची ना हरकत प्रमाणपत्रे.

  • निर्माल्य संकलनासाठी विशेष निर्माल्य रथ.

  • विसर्जनस्थळी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सुविधा.

  • शहरात विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव.

  • मोठ्या मूर्तींसाठी गोरेवाडा, पोलीस लाईन टाकळी, लकडगंज आणि कोराडी येथे विशेष विसर्जन व्यवस्था.

  • घरगुती गणेशमूर्तींसाठी विसर्जन रथ, ज्याचा विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लाभ होणार आहे.

  • महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून यंदाचा गणेशोत्सव अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि नागरिकांसाठी सुलभ करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news