

MP Bhajan Competition Nagpur
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित खासदार भजन स्पर्धेत ७५४ भजनी मंडळांनी उत्साहात सहभाग नोंदवून विठ्ठलभक्तीचा जागर केला.
दक्षिण पश्चिम विभागाच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम सद्गुरुदास विजयराव देशमुख महाराज यांना खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे गौरीशंकर पाराशर, मनीषा काशीकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुनील मित्रा, नगरसेविका शिवानी दाणी-वखरे, निधी तेलगोटे, अश्विनी जिचकर, वर्षा चौधरी, मायाताई हाडे, अमोल श्यामकुळे, दिलीप दिवे, विनोद शिंदे, वंदना शर्मा, अंजली देशपांडे, सवडेकर, दक्षिण पश्चिमचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
या भजन स्पर्धेत नागपुरातील ७५० हून अधिक भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला आहे. भजन स्पर्धेतून २१ भजनी मंडळांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार आहे.
महाअंतिम फेरी शनिवार दि. २१ फेब्रुवारीला दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत शिक्षक सहकारी बँक सभागृह गांधीसागर महाल येथे होणार आहे. नितीन गडकरी, सौ. कांचनताई गडकरी आणि श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरीचे पद्मश्री जनार्दनपंत बोथे गुरुजी यांच्या विशेष उपस्थितीत सायंकाळी ६ वाजता पुरस्कार वितरण होणार आहे.
या खासदार भजन स्पर्धेचे संयोजन डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले असून स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सपना रोडी, प्रदीप अवचट, सुजाता काथवटे, दर्शना नखाते, सुजाता खांबाता, अभिजित कठाले, विजय येरणे, कृष्ण डोमके, दौतपुरे, ज्योती हराड, धनश्री बोरकर, प्रज्ञा जोशी, चंद्रशेखर दुबे आदींनी परीश्रम घेतले.