Nagpur News | भारत विकास परिषदेची रेशीमबागेत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; देशभरातील शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती

सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा
Bharat Vikas Parishad Nagpur Meeting
Bharat Vikas Parishad Nagpur MeetingPudhari
Published on
Updated on

Bharat Vikas Parishad Nagpur Meeting

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात भारत विकास परिषदेची द्विदिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक स्मृती मंदिर रेशिमबाग येथे सध्या सुरू आहे. देशभरातील शेकडो कार्यकर्ते डॉ. हेडगेवार स्मारक समिती येथील 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी आयोजित या परिषदेसाठी एकवटले आहेत.

यानिमित्ताने राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होणार आहे. या बैठकीत संघटनात्मक विकासाशी संबंधित सेवा आणि संस्कृतीच्या विविध पैलूंचा राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेतला जात असून भविष्यातील कृती योजना तयार केल्या जाणार आहेत.

Bharat Vikas Parishad Nagpur Meeting
Nagpur News | अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा द्या: समता सैनिक दलाचे संविधान चौकात धरणे

उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त सरचिटणीस मुकुंद राव यांच्या हस्ते झाले. विविध सत्रात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांनी पत्र परिषदेत दिली.

दहा प्रदेश आणि 80 प्रांतांमध्ये परिषदेचे संघटन असून देशभरात 1600 वर शाखा 85000 कुटुंब सदस्य आहेत. स्वामी विवेकानंदांच्या आदर्शनुसार संस्कृती केंद्रित गैरराजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि स्वयंसेवी स्वरूपाच्या राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्य आणि देशभक्ती रुजवण्यासाठी ही परिषद विविध उपक्रम राबवते.

Bharat Vikas Parishad Nagpur Meeting
Nagpur News |धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज पंचत्वात विलीन, अंत्यदर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी 

यात देशभक्तीपर गीत गायन, गुरुवंदन क्षेत्र अभिनंदनचा प्रामुख्याने समावेश आहे. ॲनिमिया मुक्त भारत यासोबतच वैद्यकीय क्षेत्रात गरजूंना मदतीचा हात या परिषदेमार्फत दिला जातो अशी माहिती राष्ट्रीय सरचिटणीस दुर्गा दत्त शर्मा, राष्ट्रीय संघटन मंत्री सुरेश जैन यांनी दिली. भविष्यात बुद्धिवंतांची बैठक समस्या व समाधान यावर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विदर्भ प्रांतात अडीचशे सदस्य असल्याची माहिती प्रांताध्यक्ष पद्माकर धनोडकर, सरचिटणीस आसावरी वरकड यांनी दिली. या परिषदेसाठी चंद्रशेखर घुसे, लक्ष्मीनिवास जाजू, विनोद लाठीया, सीमा मुंशी, संजय गुळकरी, छाया शुक्ला, चंद्रकांत रागीट, दिलीप गुळकरी, वसंत काकडे, कौस्तुभ लुले, राजश्री बाबर, कविता भोसले आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news