Nagpur murder case : 'लिव्ह-इन'चा रक्तरंजित शेवट; नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रियकराला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

डोक्यात लोखंडी तव्याने वार करणाऱ्या आरोपीला आजीवन कारावासासह ठोठावला दंड
Nagpur murder case
Nagpur murder case Pudhari
Published on
Updated on

Nagpur Murder Case

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी तव्याने वार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपीवर दंडही ठोठावला.

दोघांमध्‍ये वाद प्रेयसीच्‍या डोक्‍यात लोखंडी तव्‍याने वार

श्रद्धानंदपेठ परिसरात १ जून २०२२ रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती. आरोपी जाहीद खान याकूब खान (वय ४०, रा. श्रद्धानंदपेठ) आणि प्रिया घोडेस्वार (वय ४०) हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. घटनेच्या दिवशी मध्यरात्री दोघांमध्ये वाद झाला होता. वादाचे रूपांतर पुढे हिंसक घटनेत झाले आणि संतापाच्या भरात जाहीद खान याने प्रियाच्या डोक्यात लोखंडी तव्याने वार केला.

Nagpur murder case
Chhatrapati Sambhajinagar Crime : अल्पवयीन मुलीला गर्भवती करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी; ३० हजारांच्या दंडाची शिक्षा

उपचार सुरु असताना प्रेयसीचा मृत्‍यू

या हल्ल्यात प्रिया गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना ४ जून २०२२ रोजी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणात बजाजनगर पोलिसांनी आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Nagpur murder case
Chandrapur News : एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

आरोपी दोषी, आजीवन कारावासाची शिक्षेसह ५०० रुपयांचा दंडही

प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने आरोपी जाहीद खान याला दोषी ठरविले. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावत ५०० रुपयांचा दंडही ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरिक्त तीन महिन्यांचा कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. आसावरी पळसोदकर यांनी कामकाज पाहिले.

Nagpur murder case
Jalgaon crime news | ११ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार अन् हत्या प्रकरणी नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news