Chhatrapati Sambhajinagar Crime : अल्पवयीन मुलीला गर्भवती करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी; ३० हजारांच्या दंडाची शिक्षा

आरोपीला ठोठावलेल्या दंडाची रक्कम पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचेही आदेशात नमूद
Chhatrapati Sambhajinagar Crime
अल्पवयीन मुलीला गर्भवती करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी; ३० हजारांच्या दंडाची शिक्षाpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्यावर वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती होण्यास कारणीभूत ठरलेल्या आरोपी अक्षय ज्ञानेश्वर इंगळे (२६, रा. फुलेनगर, आंबेडकरनगर) याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी कलम ३७६ (२) आणि पोक्सोच्या कलमाखाली २० वर्षे सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीला ठोठावलेल्या दंडाची रक्कम पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात १७ वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, घटनेच्या सुमारे वर्षभरापूर्वी पीडितेची आरोपीशी ओळख होऊन त्याचे रूपांतर प्रेमात झाले. २५ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी आरोपी इंगळेने पीडितेला आपल्या घरी बोलावले व लनाचे आमिष दाखवून अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने जानेवारी २०२० मध्ये पीडितेवर घरी व ५ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी हिमायतबाग येथील तलावाजवळ अत्याचार केला.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Pune Crime : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीला ३ वर्षांची शिक्षा, जुन्नर न्यायालयाचा निर्णय

दरम्यान, २५ फेब्रुवारी २०२० रोजी पीडितेच्या वडिलांचे अर्धांगवायूच्या आजाराने निधन झाले. त्यानंतर पीडिता अमरावती येथील मावशीकडे राहण्यासाठी गेली होती. घरी परतल्यावर पीडितेचे पोट दुखत असल्याने तिच्या आईने तिला १९ सप्टेबर २०२० रोजी ईएसआयसी हॉस्पिटल येथे नेले. तेथे पीडितेची सोनोग्राफी केली असता ती गर्भवती असल्याचे समोर आले.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Chandrapur News : एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

पीडितेचा डीएनए, अधिकाऱ्यांची साक्ष ठरली महत्त्वाची

प्रकरणात तपास अधिकारी तत्कालीन सहायक निरीक्षक अल्केशा पाटील यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागूल यांनी दहा साक्षीदार तपासले. त्यात पीडिता आणि डीएनए अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी अक्षय इंगळे याला दोषी ठरवून भांदवि कलम ३७६ (२) आणि पोक्सो अंतर्गत २० वर्षे सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात अॅड. बागूल यांना अॅड. मोनाली बागूल यांनी सहकार्य केले तर पैरवी अधिकारी म्हणून महिला हवालदार घुगे यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news