School Thik Karo Campaign | काटोल येथे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या शाळा पाहणीदरम्यान पोलिसांकडून अडवणुकीचा आरोप

काटोल तालुक्यातील लाडगाव येथील शाळेत पाहणीला विरोध; ग्रामीण शाळांच्या सुविधांचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्याचा अभियानाचा दावा
Nagpur Katol School Thik Karo Campaign
Nagpur Katol School Thik Karo Campaign Pudhari
Published on
Updated on

Nagpur Katol School Thik Karo Campaign

नागपूर : ग्रामीण भागातील शासकीय शाळांमधील मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या टीमला काटोल तालुक्यातील लाडगाव येथे शाळा पाहणीदरम्यान पोलिसांनी अडविल्याचा आरोप अभियानाच्या आयोजकांनी केला आहे. पाहणी सुरू असताना पोलिसांनी टीमला थांबवून शाळेची पाहणी करण्यास विरोध केल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधा, सुरक्षितता आणि शाळेतील मूलभूत सोयी-सुविधांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी अभियानाची टीम लाडगाव येथील शासकीय शाळेत पोहोचली होती. टीमकडून पाहणी सुरू असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना थांबविल्याचे अभियानाच्या प्रतिनिधींनी सांगितले.

Nagpur Katol School Thik Karo Campaign
Nagpur Firing: नागपुरात खळबळ! काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार; दरवाजात 5 वर्षांची मुलगी उभी, CCTV फुटेज समोर

या प्रकारानंतरही टीमने संयम राखत अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. ‘स्कूल ठीक करो’ अभियान कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा प्रशासनाच्या विरोधात नसून ग्रामीण विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सुविधांची वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेणे आणि आवश्यक सुधारणा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे, हा या उपक्रमाचा हेतू असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

शाळांमधील सुविधांबाबत प्रश्न विचारणे ही सामाजिक जबाबदारी

शाळा ही विद्यार्थ्यांच्या भविष्याची पायाभरणी करणारी संस्था असल्याने तेथील सुविधा, सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांबाबत प्रश्न उपस्थित करणे ही सामाजिक जबाबदारी आहे, अशी भूमिका अभियानाच्या टीमने मांडली. प्रशासन, शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक यंत्रणांचा सन्मान राखूनच प्रत्येक शाळेची पाहणी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Nagpur Katol School Thik Karo Campaign
FDA Nagpur raid: नागपुरात अन्न अन् औषध प्रशासनाची मोठी कारवाई; २.२३ कोटींची सुपारी जप्त

दरम्यान, नागरिक-केंद्रित शाळा पाहणी उपक्रमांना प्रशासनाने सहकार्य करावे, तसेच ग्रामीण भागातील शासकीय शाळांची वास्तविक परिस्थिती समोर आणून आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news