FDA Nagpur raid: नागपुरात अन्न अन् औषध प्रशासनाची मोठी कारवाई; २.२३ कोटींची सुपारी जप्त

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवायांमुळे शहरातील खाद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
Betel nut
Betel nutFile Photo
Published on
Updated on

FDA Nagpur raid

नागपूर : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवायांमुळे शहरातील खाद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. कळमणा परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तब्बल ५५ हजार ९९६ किलो भाजलेली सुपारी जप्त केली असून, या साठ्याची अंदाजे किंमत २ कोटी २३ लाख ९८ हजार ४०० रुपये आहे. सुपारीचा साठा निकृष्ट असल्याच्या संशयावरून प्रशासनाने त्याची तपासणी सुरू केली आहे. दरम्यान, प्रतापनगर येथील 'बुऱ्हानपूर जिलेबी सेंटर' आणि गिरीपेठ येथील 'स्टेप इन रेस्टॉरंट'चे अन्नपरवाने निलंबित करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न शाखेने २४ ऑगस्ट रोजी कळमणा येथील 'गौरीश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड'ची तपासणी केली. यावेळी कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजलेली सुपारी साठवून ठेवण्यात आल्याचे आढळले. एकूण ५५,९९६ किलो सुपारीचा हा साठा असून उसकी किंमत २ कोटी २३ लाख ९८ हजार ४०० रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Betel nut
Nagpur Firing: नागपुरात खळबळ! काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार; दरवाजात 5 वर्षांची मुलगी उभी, CCTV फुटेज समोर

मोठ्या प्रमाणातील या साठ्यामुळे, प्रशासनाने सुपारीची गुणवत्ता, साठवणूक तसेच संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. सुपारी निकृष्ट असल्याचा संशय असल्याने अन्नसुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नमुने घेत तपासणी करण्यात येत असून, त्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे.

'बुऱ्हानपूर जिलेबी सेंटर'चा परवाना निलंबित

दरम्यान, प्रतापनगर रिंगरोडवरील 'सावनाली अपार्टमेंट' परिसरातील 'बुऱ्हानपूर जिलेबी सेंटर'ची नियमित तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान स्वच्छता, अन्न हाताळणी, साठवणूक, पाणीपुरवठा आणि कर्मचाऱ्यांची स्वच्छता यांसारख्या अन्नसुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला.

'स्टेप इन रेस्टॉरंट'मध्येही नियमांचे उल्लंघन

तसेच गिरीपेठ येथील लॉ कॉलेज चौकातील 'स्टेप इन रेस्टॉरंट'मध्येही अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. त्यामुळे या रेस्टॉरंटचाही अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.

कळमणा येथील 'गौरीश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड'मधील सुपारी साठ्यावरील कारवाई आणि 'बुऱ्हानपूर जिलेबी सेंटर' तसेच 'स्टेप इन रेस्टॉरंट'वरील कारवाई या स्वतंत्र कारवाया असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हॉटेल्स व खाद्य आस्थापनांवरील कारवाई ही नियमित तपासणीदरम्यान आढळलेल्या अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या त्रुटींमुळे करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

Betel nut
Nagpur Bribe | बार परवान्यासाठी २.५० लाखांची लाच घेताना दुय्यम निरीक्षक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news