

Kamthi Local Body Election political violence
नागपूर जिल्ह्यातील कामठी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. आज प्रभाग क्रमांक 10 बूनकर कॉलनी परिसरात जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाली. समाजवादी पक्षाच्या महिला उमेदवाराचे पती मोहसीन अख्तर (39) याच्यावर काही युवकांनी रॉडने हल्ला करत पिस्तूलाचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना सायंकाळी चार वाजता घडली.
जखमी मोहसीन अख्तर याला तातडीने कळमना मार्गावरील सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्या उजव्या हाताला जबर मार बसल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, मोहसीन आपल्या चार मित्रांसह पशुवैद्यकीय रुग्णालयासमोर बसला असताना त्याच परिसरातील बिलाल नागानी हा सहा जणांसह तेथे पोहोचला.
त्याने विनाकारण शिवीगाळ करत मोहसीनवर रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वार डोक्यावर करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत मोहसीनने तो उजव्या हातावर झेलला. त्यानंतर बिलालनेअसला तरी पिस्तूल काढत ‘ठार मारून टाकीन’ अशी धमकी दिल्याचे मोहसीनने तक्रारीत नमूद केले.
मोहसीनने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, हा संपूर्ण वाद नगर परिषद निवडणुकीशी संबंधित आहे. प्रभाग क्रमांक 10 मधून त्याची पत्नी समाजवादी पक्षातर्फे उमेदवार होती.तर काँग्रेसकडूनही एक महिला उमेदवार रिंगणात होती. 28 नोव्हेंबर रोजी बिलालने मोहसीनला धमकी देत “उमेदवारी परत घे, अन्यथा जिवंत ठेवणार नाही” असा इशारा दिला होता. यामुळे मतदान पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झालेला हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नवीन कामठी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. अग्रवाल यांच्या फॉर्म हाऊसवर धाडीनंतर आज भाजप आणि काँग्रेस, बरीएमने निवडणूक रद्द करण्याच्या मागणीसह परस्परांवर आरोप केल्याने वातावरण तापले.