Solapur Local Body Elections : दहा नगरपालिकांसाठी 67.10 टक्के मतदान

सांगोल्यात सर्वाधिक 71 तर बार्शीत सर्वात कमी 63 टक्के मतदान
Local Body Elections
Local Body Elections (File Photo)
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी दि. 2 डिसेंबर रोजी रोजी सरासरी 67.10 टक्के मतदान झाले असून, सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वाधिक 71 टक्के तर सर्वात कमी बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 63 टक्के इतके मतदान झाले.

मंगळवेढा वगळता इतर 10 नगरपालिकेसाठी मंगळवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान घेण्यात आले. परंतु काही मतदान केंद्रावर सायंकाळी मतदारांची गर्दी झाली होती. 4 लाख 3 हजार 810 इतके मतदार होते. यापैकी 2 लाख 70 हजार 941 मतदारांनी मतदान केले.

अकलूज नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 34 हजार 408 मतदार होते. यापैकी 23 हजार 817 मतदारांनी मतदान केले. याठिकाणी सरासरी 69.22 टक्के मतदान झाले. कुर्डुवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 23 हजार 791 मतदार होते. यापैकी 15 हजार 901 मतदारांनी मतदान केले. याठिकाणी 66.84 टक्के मतदान झाले.

बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 1 लाख 9 हजार 12 मतदार होते. 69 हजार 69 मतदारांनी मतदान केले. सरासरी 63.36 टक्के मतदान झाले. पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 94 हजार 559 मतदार होते. यात 60 हजार 841 मतदारांनी मतदान केले. सरासरी 64.34 टक्के मतदान झाले. अक्कलकोट नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी एकूण 38 हजार 442 मतदार होते. 24 हजार 700 मतदारांनी मतदान केले. सरासरी 64.25 टक्के इतके मतदान झाले.

दुधनी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 10 हजार 905 मतदार होते. 7 हजार 779 मतदारांनी मतदान केले. सरासरी 70.97 टक्के मतदान झाले. करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 22 हजार 116 मतदार होते. 16 हजार 96 मतदारांनी मतदान केले. सरासरी 72.78 टक्के मतदान झाले. मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 24 हजार 413 मतदार होते. यात 17 हजार 509 मतदारांनी मतदान केले. सरासरी 71.71 टक्के मतदान झाले.

सांगोला नगरपालिकेसाठी एकूण 33 हजार 698 मतदार होते. 26 हजार 182 मतदारांनी मतदान केले. 77.70 टक्के मतदान झाले. मैंदर्गी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 12 हजार 456 मतदार होते. यापैकी 9 हजार 87 मतदारांनी मतदान केले. सरासरी 72.89 टक्के मतदान झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news