

Washim Risod municipal council Election
वाशिम : (पुढारी वृत्तसेवा)
वाशिम आणि रिसोड नगरपरिषदेचा सुधारित निवडणूक कार्यक्रम राज्य जाहीर करण्यात आला आहे. यात वाशिमच्या संपूर्ण नगरपरिषद निवडणूक आणि रिसोडमधील प्रभाग क्रमांक ५ ब आणि प्रभाग क्रमांक १० अ चा समावेश आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली आहेत.
१. वाशिम संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक
२. रिसोड प्रभाग क्र. ५-ब व प्रभाग क्र. १०-अ
वाशिम संपूर्ण नगरपरिषद तसेच रिसोड नगरपरिषद अंतर्गत प्रभाग ५-ब आणि १०-अ या जागांवरील निवडणुकीसंदर्भातील न्यायालयीन अपील व नमूद बाबींमुळे सुधारित निवडणूक कार्यक्रम वेळापत्रकानुसार राबविण्यात येणार आहे. संबंधित मतदार व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनानं केलं आहे.
१ नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक दि. १०/१२/२०२५, दुपारी ०३.०० वाजेपर्यंत
२ निवडणूक चिन्ह नेमून देणे व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे दि. ११/१२/२०२५
३ मतदानाचा दिनांक दि. २०/१२/२०२५, सकाळी ७.३० ते सायं. ५.३० वाजेपर्यंत
४ मतमोजणी व निकाल जाहीर करणे दि. २१/१२/२०२५, सकाळी १०.०० पासून
५ शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करणे दि. २३/१२/२०२५ पूर्वी (कलम १९ मधील तरतुदीनुसार)