Nagpur Crime | नागपूरमध्ये बेपत्ता गेस्ट हाऊस व्यावसायिकाचा खून; पोत्यात मृतदेह सापडल्याने खळबळ

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नारा नदी पुलाखाली पोत्यात बांधलेला मृतदेह आढळला
 Body Found in Nara River Bridge
Body Found in Nara River BridgePudhari
Published on
Updated on

Body Found in Nara River Bridge

नागपूर : शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नारा नदी पुलाखाली पोत्यात बांधलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात हा मृतदेह सुनिल साहू यांचा असल्याचे निष्पन्न झाले असून ते गेस्ट हाऊस व्यावसायिक होते.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नारा नदीच्या पुलाखालील नाल्याच्या कोरड्या भागात संशयास्पद पोते आढळल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोते उघडून पाहणी केली असता त्यात मृतदेह आढळून आला. मृतदेह पोत्यात बांधून टाकण्यात आल्याने हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 Body Found in Nara River Bridge
Nagpur Crime: हिंदू मुलींना खुदा हाफीज म्हणायचा... युवतींच्या शोषणाचाही आरोप; नागपूरच्या एनजीओ चालकास पोलिस कोठडी

दरम्यान, सुनिल साहू हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या हरवल्याची तक्रार यापूर्वीच पोलिसांकडे नोंदवण्यात आली होती. आता त्यांचा मृतदेह आढळल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यवान बंडीवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, पंचनामा व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. खून नेमका का करण्यात आला, यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून विविध अँगलने तपास सुरू आहे.

 Body Found in Nara River Bridge
Nagpur Crime | नागपुरात खळबळ : 58 डिटोनेटर, 15 जिलेटीनच्या कांड्या आढळल्या, शोधमोहीम सुरू

दरम्यान, आरोपींनी दुसऱ्या ठिकाणी खून करून मृतदेह येथे आणून टाकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, संशयितांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news