Nagpur Central Jail | 'व्याकुळला जीव माझा बाळा तुझ्या रे भेटीला' : नागपूर कारागृह आईवडील- निराधार लेकरांच्या गळाभेटीने गहिवरला

166 बंदयांच्या एकूण 283 पाल्यांनी प्रत्यक्ष कारागृहात आपल्या आई वडिलांची ३० मिनिटे भेट घेतली
Children Meet Parents in Nagpur Jail
Children Meet Parents in Nagpur Jail Pudhari
Published on
Updated on

Children Meet Parents in Nagpur Jail

नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील अनोखी" गळाभेट कार्यक्रमात आज व्याकुळला जीव माझा बाळा तुझ्या रे भेटीला " असेच काहीसे चित्र बघायला मिळाले. "सुधारणा व पुनर्वसन" हे महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रिद वाक्य आहे. त्यानुसार कारागृहातील गुन्हेगारांच्या विचारसरणीत व वर्तणुकीत सुधारणा करुन समाजात त्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन म्हणून आज हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमात 166 बंदयांच्या एकूण 283 पाल्यांनी प्रत्यक्ष कारागृहात आपल्या आई वडीलांची ‍ ३० मिनिटे भेट घेतली. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा,पुणे, योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, वैभव सु. आगे, अधीक्षक नागपूर मध्यवर्ती कारागृह तथा कारागृह उपमहानिरीक्षक, पूर्व विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली "उद्घाटक व प्रमुख अतिथी" म्हणून ए. ए. आयचित, जिल्हा न्यायाधिश व अतिरीक्त सत्र न्यायाधिश, होते.

Children Meet Parents in Nagpur Jail
Nagpur Air India Flights | नागपुरातून दिल्ली, मुंबई जाणारी स्थगित विमाने पुन्हा सुरू होणार

माणसाच्या हातुन गुन्हा नकळत घडत असतो. वाल्याचा वाल्मीकी झाला त्याप्रकारे आपल्यामध्ये बदल घडविण्याचा प्रयत्न करावा. न्यायालय शिक्षा देते परंतु कारागृह प्रशासन आपले पालन पोषण व सर्व सुविधा पुरविते, त्यामुळे कारागृहात आपले वर्तन नेहमी चांगले ठेवण्याचा प्रयत्न करावा असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात बंदयांच्या एका मुलाने आईवरील स्वत:लिखित कविता सादर केली. तसेच एका सहा वर्षाच्या मुलीने गीत गायन केले. कारागृहातील सिध्ददोष पुरूष बंदयांच्या, सिध्ददोष व न्यायाधीन महिला बंदयांचे 18 वर्षाखालील मुले, भाऊ-बहीण व नातवंडाकरीता तसेच १8 वर्षाखालील मुले, भाऊ-बहीण व नातवंडे यांच्या करिता कारागृहातच प्रत्यक्ष भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Children Meet Parents in Nagpur Jail
Nagpur Accident : दारूच्या नशेत भरधाव रिक्षाने दोघांना उडविले; सराईत गुन्हेगाराला अटक

कारागृहातील शिक्षा भोगून पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी आणि समाजाने त्यांना स्वीकृत करून समानतेची वागणूक मिळावी आणि बंदयांना आपल्या कुटुंबाबद्दल सहानुभूती व आपुलकी निर्माण होण्याचा हा प्रयत्न आहे.

या भेटी दरम्यान सर्व प्रथम काही मुले लाजत संकोचत, घाबरत भेटीसाठी आली. परंतु, नंतर मात्र आनंदाने आपल्या वडिलांच्या, आजोबांच्या अंगा खांद्यावर मनोसक्तपणे खेळली. कारागृह अधीक्षक वैभव सु.आगे, अतिरिक्त अधीक्षक दिपा वै. आगे, उपअधीक्षक श्रीधर काळे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी मनोहर भोसले यांनी यासाठी पुढाकार घेतला.

Children Meet Parents in Nagpur Jail
Prostitution racket nagpur : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! परराज्यातील महिलांकडून देह व्यापार; टोळी गजाआड, तरुणींची सुटका

कारागृहातील उपहार गृहामार्फत बंदयांना ‍बिस्कीट, चॉकलेट, सोनपापडी, चिवडा, वेफर्स आदी वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या. बंदयांनी त्यांचे कारागृहातील वेतनाचे पैशातून विविध खाद्यवस्तु व चॉकलेट्स दिले. टाटा सामाजिक विज्ञान संस्थान मुंबई आणि नागपूर हाऊसेस ऑफ मेरी इम्माकुलेट संस्था नागपूर व मेरी सेलीयन सोसायटी यांचे संयुक्त विद्यमाने 220 बंदयांच्या पाल्यांना त्यांचे शैक्षणिक वर्गानुसार स्कुल बॅग, पाठय-पुस्तके, नोटबुक, रजिष्टर, कंपास पेटी, टिफीन बॉक्स, पाणी बॉटल इत्यादी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news