Prostitution racket nagpur : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! परराज्यातील महिलांकडून देह व्यापार; टोळी गजाआड, तरुणींची सुटका

सुटका केलेल्या पीडित महिलामध्ये उझबेकिस्तान देशातील 2, पंजाब, दिल्ली, कोलकत्ता राज्यातील 3 पीडित महिलाचा समावेश आहे
Prostitution racket nagpur : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! परराज्यातील महिलांकडून देह व्यापार; टोळी गजाआड, तरुणींची सुटका
Published on
Updated on

नागपूर : सामाजिक सुरक्षा विभागाने आज (दि.11) शनिवारी विदेशी व परराज्यातील महिलांकडून देह व्यापार, टोळी गजाआड केली आहे. पोलीस स्टेशन अंबाझरी हद्दीत हा प्रकार उघडकीस आला. आरोपीचे नाव सचिन माणिकराव महाजन (वय : 38 वर्ष, रा: प्लॉट नंबर 179, भवानीनगर पूना रोड) असे आहे.

Prostitution racket nagpur : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! परराज्यातील महिलांकडून देह व्यापार; टोळी गजाआड, तरुणींची सुटका
Nagpur Crime News: देहव्यापाराविरोधात मोठी कारवाई; गंगा-जमुना परिसरातून युवतीची सुटका

सुटका केलेल्या पीडित महिलामध्ये उझबेकिस्तान देशातील 2, पंजाब, दिल्ली, कोलकत्ता राज्यातील 3 पीडित महिलाचा समावेश आहे. अद्याप या टोळीतील समीर उर्फ मनीष उर्फ गगन ठाकूर, राहुल आणि पूजा नावाची महिला फरार आहेत. त्यांच्याकडून चौकशीत यातील रॅकेट पुढे येऊ शकते. अंबाझरी पोलिस स्टेशन हद्दीत हॉटेल पेटल इनचे समोरील सार्वजनिक रस्त्यावर गोकुळपेठ परिसरात हा सर्व प्रकार आंबट शौकीन हेरून केला जात होता.

Prostitution racket nagpur : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! परराज्यातील महिलांकडून देह व्यापार; टोळी गजाआड, तरुणींची सुटका
Jalna Crime News : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दीड लखाचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत एक स्विफ्ट डिझायर कार, एक मोबाईल फोन, 8 हजार रुपये रोख असा एकूण 5.18 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे आरोपी लॉगिन परसर्नेल मीटिंग या ॲपवर देह व्यापारकरिता सांगितलेल्या ठिकाणी महिला, मुली उपलब्ध करून देत होते. बोगस पंटरच्या मदतीने ही कारवाई केली गेली. आरोपी हे स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता पीडित महिलांना कमी वेळात जास्त पैसे कमवण्याचे आमिष देऊन त्यांना ग्राहक पुरवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत होते. या पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती दर्शन पाटील , पोलीस निरीक्षक सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा नागपूर शहर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news