

Nagpur Hit And Run
नागपूर : दारूच्या नशेत भरधाव ऑटोरिक्षा चालवत दोन अपघात घडवून कारवाई करणाऱ्या पोलिसांनाच धमकावणाऱ्या सराईत आरोपीला पारडी पोलिसांनी अटक केली आहे.
या आरोपीविरुद्ध यापूर्वी २६ गुन्ह्यांची नोंद आहे. प्रणय ऊर्फ अंकित रामकुमार देशमुख (वय २८, अंबेनगर, भांडेवाडी) असे या आरोपीचे नाव आहे. हनुमान मंदिर चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम सुरू असताना प्रणयने भरधाव ऑटो चालवत एका दुचाकीला धडक दिली.
या अपघातात दोघे आणि एक लहान मुलगा असे तिघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर प्रणय पळून जात असताना त्याने आणखी एका अॅक्टिव्हाला धडक दिली. वाहतूक पोलिस हवालदार अतुल ठाकरे यांनी त्याला पकडले. यावेळी प्रणयने पोलिसांशी उर्मट वर्तन केले आणि त्यांनाच धमकावले.