

HSC result 2025
नागपूर - अखेर राज्य शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. सरासरी निकाल 91.88 टक्के असून नेहमीप्रमाणे विज्ञान विभागाची सरशी तर कला विभागाची पिछाडी असून मुलींनी बाजी मारली आहे.
विभागनिहाय निकाल टक्केवारी लक्षात घेता नागपूरचा क्रमांक 90.52 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी आणि एकंदर सर्व विभागात चौथा आहे. नागपूर विभागात दीड लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. निकाल जाहीर होताच कडक ऊन असूनही विविध महाविद्यालयात दुपारी तीन नंतर पालक, विद्यार्थी,शिक्षकवृंद जल्लोष साजरा झाला. कधीकाळी सातत्याने लातूर पॅटर्न म्हणून नावारूपास आलेले लातूर बोर्ड या निकालात सर्वात शेवटी आहे. विभागनिहाय निकालाची टक्केवारी अशी आहे.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी अशी आहे.
पुणे – 91.32%
नागपूर – 90.52%
संभाजीनगर – 92.24%
मुंबई – 92.93%
कोल्हापूर – 93.64%
अमरावती – 91.43%
नाशिक – 91.31%
लातूर – 89.46%
कोकण – 96.74%