CISCE ICSE ISC Results 2025
नवी दिल्ली : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशन (CISCE) ने बुधवारी आयसीएसई (ICSE) दहावी आणि आयएससी (ISC) बारावी २०२५ परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी त्यांचा निकाल cisce.org वर आणि results.cisce.org वर पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅप्चा कोड नमूद करावा लागेल.
बारावी आयएससी परीक्षा १३ फेब्रुवारी ते ५ एप्रिल दरम्यान आणि दहावी आयसीएसई परीक्षा १८ फेब्रुवारी ते २७ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. दहावीचा निकाल ९९.०९ टक्के लागला आहे. दहावीत मुली आणि मुलांच्या उत्तीर्णतेचे अनुक्रमे ९९.३७ टक्के आणि ९८.८४ टक्के एवढे आहे.
cisce.org या अधिकृत वेबसाईटवर जा.
त्यानंतर तुम्हाला ज्या वर्गाचा निकाल पाहायचा आहे त्यावर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर सबमिट करा.
तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
विद्यार्थी निकाल पाहिल्यानंतर डाउनलोड करु शकतात.
CISCE दहावीचा निकाल डिजिलॉकर पोर्टलवरदेखील पाहू शकता. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी results.digilocker.gov.in ला भेट द्यावी.
आयएससी बारावीत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.६४ टक्के एवढे आहे. तर मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.४५ टक्के आहे. एकूण ९९,५५१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिला होती. त्यातील ९८,५७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.