Beed Crime News : केजमध्ये दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटले; पोलिसांनी अवघ्या ४ तासांत दोघांना केले जेरबंद

दाम्पत्याला अडवून लूट; गुन्ह्यातील मोटारसायकलच ठरली चोरट्यांच्या अटकेचे कारण
Beed Crime News
Beed Crime News : केजमध्ये दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटले; पोलिसांनी अवघ्या ४ तासांत दोघांना केले जेरबंद file photo
Published on
Updated on

Beed Crime News: Couple robbed at knifepoint in Kej; police apprehend two suspects within just 4 hours

गौतम बचुटे/केज :- सासरवाडीहून रात्री उशिरा मोटार सायकलवर गावाकडे जात असलेल्या पती-पत्नीला अडवून चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम आणि महिलेच्या गळ्यातील दागिने चोरून नेलेल्या आरोपीला केज पोलिसांनी अवघ्या चार तासात दोघांना जेरबंद केले आहे.

Beed Crime News
Partur Theft News : खांडवी येथे एकाच रात्री दोन ठिकाणी धाडसी चोऱ्या

पिसेगाव ता. केज येथील धनराज नामदेव सूर्यवंशी आणि त्यांची पत्नी सौ. प्रियांका धनराज सूर्यवंशी हे दिनांक १३ जून रोजी रात्री त्यांची सासरवाडी उमरी येथून अधिक मासातील धोंडे जेवणाचा कार्यक्रम आटोपून रात्री सुमारे ११:०० वाजण्याच्या सुमारा पिसेगावकडे जात असताना त्यांना केज-अंबाजोगाई रोडवरील पिसेगाव फाट्या पासून सुमारे १०० मीटर अंतरावर त्यांच्या मागून एका मोटर सायकलने चौघांनी पाठलाग करून अडविले. त्यांना अडविल्या नंतर एकाने धनराज सूर्यवंशी यांच्या गळ्याला चाकू लावून खिशातील रोख दोन हजार रु. काढून घेतले आणि त्यांची पत्नी प्रियांका हिच्या गळ्यातील अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र हिसकावून घेतले.

चार चाकी वाहन दिसताच चोरटे मोटार सायकल सोडून पळाले :- चोरट्यांनी चोरी करून पळून जात असताना प्रियंका सूर्यवंशी हिने आरडा ओरड केली आणि त्याच वेळी समोरून एक चार चाकी वाहन येताना दिसले आणि त्याच वेळी शेतात पेरणी करीत असलेले शेतकरी त्यांच्या दिशेने येताना दिसताच चोरट्यांनी त्यांची मोटार सायकल सोडून पळून गेले.

अवघ्या चार तासात दोघे जेरबंद :- पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने यांनी त्याचे सहकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सानप, सहाय्यक उपनिरीक्षक शंभुदेव दराडे, हेडकॉन्स्टेबल विष्णू नागरगोजे, नागरगोजे, गोविंद मुंडे, दादाराव देवगुडे, बाळासाहेब अहंकारे यांनी चोरट्यांचा माग काढून त्यांचा पाठलाग केला. पोलिसांनी चौघा पैकी दोघांना धाराशिव जिल्ह्यातील मोहा ता. कळंब येथून ताब्यात घेतले.

फरार असलेल्या दोघांना तपास सुरू :- पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या इतर दोन साथीदारांचा पोलिस तपास घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या दोघांकडून इतर चोरी दरोडे आणि वाटमारीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Beed Crime News
Parbhani crime: पूर्णा शहरात घरफोडी; चोरट्यांचा 1.5 लाख रोख रक्कमेसह दागिन्यांवर डल्ला

मोटार सायकल सापडल्याने चोरट्यांचा माग काढणे सुलभ झाले :- चोरट्यांनी त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल क्र. (एम एच ४५/क्यू ८१८३) ही सोडून पळ काढल्याने पोलिसांना त्यांचा माग काढणे सुलभ झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news