Nagpur Marbat Festival | नागपूरचा ऐतिहासिक मारबत महोत्सव आता जागतिक स्तरावर

स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे यांच्याकडून दिल्लीत राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांना निमंत्रण
Marbat Festival Nagpur
Marbat Festival NagpurPudhari
Published on
Updated on

Nagpur Municipal Corporation

नागपूर : नागपूरच्या ऐतिहासिक आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने यंदा भव्य ‘मारबत व बडग्या महोत्सवाचे’ आयोजन करण्यात येत आहे. शहरात पर्यटकांचा ओघ वाढविण्यासोबतच नागपूरचा सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या अर्थसंकल्पात महोत्सवासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे.

महोत्सवाला राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांची उपस्थिती लाभावी, यासाठी स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी थेट दिल्ली येथे जाऊन विविध मान्यवरांना अधिकृत निमंत्रण दिले. गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि खासदार विनोद तावडे यांना त्यांनी स्वतः महोत्सवासाठी निमंत्रित केले.

Marbat Festival Nagpur
Nagpur Firing: नागपुरात खळबळ! काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार; दरवाजात 5 वर्षांची मुलगी उभी, CCTV फुटेज समोर

महापौर निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन आणि क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड यांच्या देखरेखीखाली महोत्सवाची तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत आहे.

मान्यवरांमध्ये मारबत महोत्सवाविषयी उत्सुकता निर्माण व्हावी, यासाठी ‘इडा-पिडा घेऊन जा गे मारबत’ या बोधवाक्यासह विशेष निमंत्रण बॉक्स तयार करण्यात आला आहे. या बॉक्समध्ये महोत्सवाचे बोधचिन्ह, मोमेंटो आणि भेटवस्तूंचा समावेश आहे.

Marbat Festival Nagpur
Nagpur Cobra Rescue | नागपूर : न्यायाधीश निवासस्थानातून पाच फुटी नागाचे थरारक रेस्क्यू

यावेळी दाणी-वखरे यांनी मान्यवरांना महोत्सवाचे नियोजन आणि त्यामागील उद्दिष्टांची माहिती दिली. नागरिक तसेच पर्यटकांसाठी सात दिवसीय विशेष ‘सावजी आणि बुनकर महोत्सवा’चे आयोजन करण्यात येणार आहे. शहरातील सुमारे १०० चौकांमध्ये QR कोडच्या माध्यमातून मारबत महोत्सवाची ऑडिओ-व्हिज्युअल माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शहरातील एलईडी स्क्रीनवर देशभक्तीपर गीतांचे प्रसारण करण्यात येणार आहे.

महोत्सवासाठी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी शहरातील हॉटेल्स आणि निवासी व्यवस्थेचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने विशेष ग्रेडिंग व प्रमाणपत्र प्रणाली राबविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

Marbat Festival Nagpur
Nagpur Court News | काटोलच्या नितेश गजबे खून प्रकरणात दोघांना जन्मठेप

सुमारे १४५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मारबत महोत्सवाच्या माध्यमातून नागपूरच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर प्रसार करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. नागपूरची ओळख आणि सांस्कृतिक वैभव देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने यंदाचा मारबत महोत्सव महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news