

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : हिंगणा, वाडी परिसरात असलेल्या बायोडायव्हर्सिटी पार्क मधील जंगलाला आज (दि.१२) दुपारी आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. एमआयडीसी व वाडी फायर स्टेशनच्या अग्निशमन जवानांनी यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. Nagpur
दुपारच्या वेळी आगीचे लोळ व धूर दिसत असल्याने सारिका राऊत यांनी या जैवविविधता प्रकल्पात आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर तातडीने त्रिमूर्ती नगर येथून अग्निशमन विभागाची गाडी क्रमांक 4814 सिविल मुख्यालय येथून गाडी क्रमांक 7926 तातडीने घटनास्थळी पोहोचली. Nagpur
दरम्यान, वाडी व एमआयडीसी फायर स्टेशन येथुनही अग्निशमन जवानांनी धाव घेत नियंत्रण मिळवले. गेल्या वर्षी देखील या बायोडायव्हर्सिटी पार्कला आग लागल्याची घटना घडली होती. नागपुरात मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने आगीच्या घटना वाढण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा