

Nagpur Drought Borewell Drilling Ban: दुष्काळाची मार झेलणाऱ्या विदर्भातील नागपूरमध्ये भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळामुले नागपूर जिल्ह्यात आता बोअरवेल खोदकामावर बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
नागपूर जिल्ह्यात या बाबतचे आदेश अनेक ठिकाणी लागले आहेत. नागूपरमध्ये बोअरवेल खुदाईला बंदी असलेले पोस्टर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे घरगुती वापरासाठी जिल्ह्यात बोअरवेल खुदाईला बंदी नसल्याने सामान्य नागपूरकरांना मोठा दिसाला मिळाला आहे.
नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यात त्यांनी कमी पाऊस आणि धरणातील कमी पाणी साठा यामुळे संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नवीन बोअरवेल खोदकामांना बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात आले.
त्याचबरोबर बोअरवेल आणखी खोल करण्याच्या कामांबाबत देखील पुढील आदेश येईपर्यंत बंदी असणार आहे. ही बंदी जिल्ह्यातील संपूर्ण शहरी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी लागू असणार आहे. या बंदीतून घरगुती पाणी वापरासाठी करण्यात येणारी बोअरवेल खुदाई काम जुन्या बोअरवेलचे फ्लशिंग यातून सूट देण्यात आली आहे.
तहसीलदारांनी पोलिस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या समन्वयाने प्रतिबंधित खोदकामांची तपासणी होणार आहे तसेच बंदीचे उल्लंघन करून बोअरवेल खोदकाम केल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचे देखील सांगितलं.