Nagpur Crime | पॅरोलवर सुटताच कृषी अधिकाऱ्याला लुटले, लुटारू साथीदारासह गजाआड

Nagpur Crime | पॅरोलवर सुटताच कृषी अधिकाऱ्याला लुटले, लुटारू साथीदारासह गजाआड
Nagpur Crime
Nagpur CrimeAI PHOTO
Published on
Updated on

नागपूर : पॅरोलवर सुटताच एका साथीदाराच्या मदतीने कृषी अधिकाऱ्याला लुटणाऱ्या लुटारूला स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली. रामेश्वर प्रल्हाद प्रधान (वय ३८, रा. धनगवळीनगर, खरबी) असे अटकेतील लुटारूचे नाव आहे. अफरोज ऊर्फ सलीम मोहम्मद जियाउद्दीन शेख ऊर्फ पठाण (वय ४८, रा. शारदानगर) असे अन्य लुटारूचे नाव आहे.

Nagpur Crime
Nagpur News : मालगाडीवर चढलेल्या मनोरुग्णाला विद्युत वाहिनीचा झटका; पोलिसांच्या तत्परतेने वाचला जीव

बलात्कार प्रकरणात शिक्षा झाल्याने सलीम हा अमरावती कारागृहात शिक्षा भोगत आहे. काही दिवसांपूर्वी तो पॅरोलवर सुटला. दोघांनी सुशांत चंद्रकांत हजारे (वय ५३) यांना चाकूचा धाक दाखविला. त्यांच्याकडील रोख व त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले व दोघेही पसार झाले.

Nagpur Crime
Nagpur News : नागपूर मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यांचा धिंगाणा; जेल अधिकाऱ्यांना शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी

पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी शोध घेऊन प्रधान याला अटक केली. लुटपाट केल्यानंतर सलीमची पुन्हा रवानगी अमरावतीला कारागृहात करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांसह साडेचार लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news