Nagpur News : मालगाडीवर चढलेल्या मनोरुग्णाला विद्युत वाहिनीचा झटका; पोलिसांच्या तत्परतेने वाचला जीव

रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील घटना
Nagpur News
मालगाडीवर चढलेल्या मनोरुग्णाला विद्युत वाहिनीचा झटका
Published on
Updated on

नागपूर : मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर ओव्हरहेड विद्युत वाहिनीचा तीव्र धक्का बसल्याने एक मनोरुग्ण युवक गंभीररीत्या भाजला. स्थानकात उभ्या असलेल्या मालगाडीवर चढण्याचा प्रयत्न करताना ही घटना घडली. लोहमार्ग पोलिसांनी विद्युत वाहिनीचा प्रवाह बंद करीत या तरुणाचा जीव वाचविला. तातडीने त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शशिप्रकाश अनिरुद्ध प्रकाश (वय ३६) रा. असरपूर, ता. नैनपूर, जि. आंबेडकरनगर, बिहार हा युवक घरून बेपत्ता आणि मनोरुग्ण आहे. प्रवाशांच्या निर्देशनास आल्याने त्यांनी तत्काळ रेल्वे प्रशासनाला माहिती दिली. लोहमार्ग पोलिसांनी विद्युत प्रवाह बंद केल्याने त्याचा जीव वाचला. मात्र, विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने तो गंभीररीत्या भाजला गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news