Nagpur Crime : अल्पवयीन मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न, सोशल मीडियावर गृह विभागाची नजर

भाड्याच्या फ्लॅटमध्ये अत्याचार?
Minor Girl Assault Case
Minor Girl Assault Case file photo
Published on
Updated on

नागपूर : नागपुरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न यासंदर्भात पोलिसांची सोशल मीडियावर गृह विभागाची नजर आहे. हे प्रकरण बीडीएसएमशी संबंधित आहे का, याचाही आता पोलिसांकडून तपास केला जात आहे.

या घटनेनंतर सोशल मीडिया कंपन्यांवर सरकारची नजर असून इन्स्टाग्राम आणि फेसबुकची पालक कंपनी असलेल्या मेटाला जाब विचारणार असल्याची माहिती आहे. नागपुरात एका १६ वर्षीय मुलीची इन्स्टाग्रामवरून १९ वर्षीय तरुणाशी ओळख झाली. त्यानंतर त्या तरुणाने तिचे २४ तासांहून अधिक काळ अपहरण केल्याचा आरोप आहे. भाड्याच्या फ्लॅटमध्ये तिच्यावर बलात्कार आणि अत्याचार केल्याचेही पोलिस तपासात समोर आल्याचे समजते आहे.

Minor Girl Assault Case
Nagpur News | नागपुरात घरांची रजिस्ट्री प्रक्रिया थांबलेली नाही! सर्व अफवा खोट्या

या घटनेनंतर अल्पवयीन मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेबाबत महाराष्ट्र सरकार सोशल मीडिया कंपन्यांना जाब विचारणार आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुकची पालक कंपनी असलेल्या मेटालाही याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले जाणार आहे. गृह विभागातील सूत्रांनी ही माहिती दिली.

दरम्यान, हे प्रकरण बीडीएस एमशी संबंधित आहे का, याचाही नागपूर पोलिस आता तपास करत आहेत. बीडीएस एम हा प्रौढ व्यक्तींमधील परस्पर संमतीने केला जाणारा संबंधांचा एक प्रकार आहे. सोशल मीडियावरील काही ग्रुपमध्ये याबाबत चर्चा केली जाते. अशा ग्रुपच्या माध्यमातून अल्पवयीन मुलांना लक्ष्य केले जाते का, याचाही तपास केला जात आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी गृह विभागाकडून कायदेशीर पर्यायांचा विचार सुरू आहे.

Minor Girl Assault Case
Neelam Gorhe| मुलीवरील गंभीर अत्याचार प्रकरणी कारवाईची व्याप्ती वाढवा; संपूर्ण साखळीचा शोध घ्या : डॉ. नीलम गोऱ्हे

या प्रकरणातील आरोपी मूळचा ठाण्याचा आहे. इन्स्टाग्रामवरून त्याची पीडित मुलीशी ओळख झाली होती.

अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत महाराष्ट्र सरकार कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचाही विचार सुरु आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशनेही अल्पवयीनांसाठी सोशल मीडिया अकाउंटवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध लागू केले आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारनेही मेटाला डीपफेक आणि इतर हानिकारक एआय निर्मित सामग्रीवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news