Nagpur MD drug racket : नागपुरात ४३.७४ लाखांचा एमडी ड्रग्ज साठा जप्त; दोघांना अटक, एक फरार

गुन्हे शाखा युनिट-३ ची भांडेवाडी हद्दीत धडक कारवाई; १५१ ग्रॅम मेफेड्रोन, कार, दुचाकीसह अन्य साहित्य जप्त
MD drugs seized
pudhari photo
Published on
Updated on

नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या पथकाने भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत १५१ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडरसह तब्बल ४३ लाख ७४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, या रॅकेटमधील एका फरार आरोपीचा पोलीस वेगाने शोध घेत आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट-३ ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वैष्णवी देवी नगर येथील 'विस्टा टॅटू स्टुडिओ'जवळ सापळा रचण्यात आला होता. पोलिसांनी संशयितांची चौकशी करून एनडीपीएस (NDPS) कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करत पंचांसमक्ष त्यांची झडती घेतली.

झडतीदरम्यान आरोपींकडून ३० लाख २० हजार रुपये किमतीची १५१ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली. याशिवाय दोन मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, ३ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम, एक होंडा सिटी कार आणि एक सुझुकी ॲक्सेस दुचाकी असा एकूण ४३ लाख ७४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी मोहम्मद नियाज समसूल अन्सारी (वय ३४) आणि मोहम्मद असलम समसूल अन्सारी (वय ३४) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांवरही यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर, या प्रकरणातील विशाल उर्फ फल्ली गुप्ता हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी भांडेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(क) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास भांडेवाडी पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news