नागपूर: पुढारी वृत्तसेवा: गडचिरोली जिल्ह्यातील अमिर्झा जंगलात झालेल्या वाघ शिकार प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. शेतपीके वाचविताना रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी कुंपणात वीजप्रवाह जोडला होता. या विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाला होता. याची माहिती वनविभागाला देण्याऐवजी ग्रामस्थांनी विविध शस्त्रांनी पंजे-जबडा आणि मिशा कापून या वाघाचे सर्व अवयव लपविले. मात्र, शिकारीची माहिती मिळताच वनविभागाने जाळे पसरविले. यात चौकशीदरम्यान 6 ग्रामस्थांना ताब्यात घेत त्यांच्याकडून नखे-दात आणि मिशांसह शस्त्रे जप्त केली. याबाबतची माहिती गडचिरोलीचे सहायक वनसंरक्षक संकेत वाठोरे यांनी दिली.