भारत-पाक सामना पाहताना ‘एमसीए’चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन

भारत-पाक सामना पाहताना ‘एमसीए’चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराने निधन झाले. सहकारी पदाधिकाऱ्यांसह रविवारी रात्री अमेरिकेत झालेला उत्कंठावर्धक भारत- पाकिस्तान क्रिकेट सामना बघताना त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचे  निधन झाले. त्यांच्या निधनानंतर उद्योग, क्रीडा व सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांनी शोक संवेदना व्यक्त केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते  निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news