नागपूर : मोदी, गडकरींची हॅट्ट्रिक, लाडू वाटत कार्यकर्त्यांचा जल्लोष

नितीन गडकरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
नितीन गडकरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. गडकरी यांनी यानिमित्ताने मंत्रिपदाची हॅट्ट्रिक साधली आहे. आज त्यांनी पद व गोपनियतेची शपथ घेतली.

नितीन गडकरी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय युवा मोर्चातून केली होती. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. भारतीय युवा मोर्चा ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा अद्भुत प्रवास आहे. नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याचा नागपुरात बडकस चौक, वैष्णव देवी चौक, गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालया, नाईक तलाव असे ठिकठिकाणी लाडू वाटत, फटाके फोडून,ढोलताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला.

सलग तिसऱ्यांदा नागपूरचे खासदार नितीन गडकरी हे मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत. महामार्ग खाते कायम राहणार की अधिक महत्वाचे खाते मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मागील पाच वर्षात गडकरी यांनी रस्ते, पुलांच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केली.

नितीन गडकरी यांनी विद्यार्थी दशेत राजकीय प्रवास सुरू केला. वॉल पेंटिंग ते पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत अनेक चढउतार पाहिलेत.
मोदी यांच्या मंत्रिमंडळात सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची कामामुळे ओळख निर्माण झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून सुरू झालेला प्रावस आज केंद्रीय मंत्री पदापर्यंत येऊन पोहचला. नितीन गडकरी यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा या गावात 27 मे 1957 रोजी झाला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले नितीन गडकरी 1979 साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रांत सचिव झाले.1981 साली ते भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूर शहराध्यक्ष झाले. 1981 साली भाजपा युवा मोर्चा नागपूर शहराध्यक्ष झाले. 1958 मध्ये गडकरी यांनी पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघतून भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढविली मात्र, त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. मात्र, खचून न जाता त्यांनी नव्या जोमानं कामाला सुरवात केली. नितीन गडकरी यांना 1989 मध्ये नागपूर पदवीधर विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी विजय मिळवत राज्याच्या विधानपरिषदेत प्रवेश केला.

त्यानंतर गडकरी हे सतत 1989,1996, 2002 मध्ये विजयी झाले. 2002 मध्ये तर बिनविरोध निवडून आले. राज्यात मुंबई-पुणे 'एक्सप्रेस-वे'ची निर्मिती त्यांच्या कार्यकाळात झाली. राज्यातील पहिला 'एक्सप्रेस'वे बांधण्याचा मान गडकरींना जातो. नागपूर, मुंबईसह राज्यातील विविध भागात त्यांनी त्यावेळी शंभरहून अधिक उड्डाणपुलांची निर्मिती केली. त्यानंतर नितीन गडकरी यांना राज्यात 'पूलकरी','रोडकरी' या नावांनी ओळखलं जाऊ लागले. त्यांची तीच ओळख आजही कायम आहे. गडकरी यांना देशातील दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनी कृषी, जलव्यवस्थापन, सौरऊर्जा प्रकल्प आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले त्यांना जैव-इंधन, अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचीही आवड आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news