Jalgaon online fraud| भुसावळातील युवकाची 97.50 लाखांची ऑनलाइन फसवणूक; सायबर पोलिसांत गुन्हा

याप्रकरणी सागर मनोहर पारधीच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Online Fraud
Online Fraud
Published on
Updated on

जळगाव : भुसावळ येथे वास्तव्यास असलेल्या ३० वर्षीय युवकाची तब्बल ९७ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Online Fraud
Dombivli digital love fraud | 'डिजिटल आशिक’चे कारनामे ऐकून डोंबिवली पोलिसही अवाक् : एक.... दोन नव्हे तब्बल 140 तरुणींना गंडा!

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर मनोहर पारधी (वय ३०), मूळ रा. विटाळी, मु.पो. धानोरा, ता. नांदुरा, जि. बुलढाणा व सध्या व्हीपीए नंदन, १४, पिपल बँक कॉलनी, शांतिनगर, भुसावळ येथे वास्तव्यास आहेत. २५ जून रोजी ९२३८६५४९३९ या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून संबंधित व्यक्तीने स्वतःचे नाव 'विलास पाटील' असल्याचे सांगितले. मोबाईलवर त्याच नावाचा व फोटोचा वापर करून फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर विविध कारणे सांगत फिर्यादीकडून ऑनलाइन व्यवहाराद्वारे ९७ लाख ५० हजार रुपये स्वीकारून त्यांची फसवणूक करण्यात आली.

Online Fraud
Online Fraud | आंतरराज्यीय टोळीतील तिघे जेरबंद ; ज्येष्ठ नागरिकाची १३.८७ लाखांची ऑनलाइन फसवणूक

याप्रकरणी सागर मनोहर पारधीच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर पुढील तपास करीत आहेत. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news