नागपूर - भारत-पाक सीमा पार करून थेट पाकिस्तानात गेलेल्या नागपुरातील सुनीता जामगडे या हेरगिरीचा संशय असलेल्या महिलेची आता जम्मू-काश्मीर पोलीस देखील चौकशी करणार आहेत. लवकरच काश्मीर पोलिसांचे पथक उपराजधानीत दाखल होणार असल्याची माहिती आहे.
न्यायालयाने पोलिस कोठडी संपल्याने सोमवारी न्यायालयीन कोठडी देत सुनीताची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. मनोरुग्णालयातून औषध घेतले व चार मे रोजी ती मुलासह दिल्ली येथे गेली. मात्र यानंतर अमृतसर ऐवजी ती श्रीनगर व नंतर सोनमर्ग येथे पोहोचली. बर्फ नसल्याने सुनिता मुलाला घेऊन कारगिलला गेली. कारगिलमध्ये तिच्या मुलाची प्रकृती बरी नसल्याने त्याला हॉटेलमध्ये सोडून ती बाहेर पडली. भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला. मात्र पाकिस्तानने तिला अटक केली. चौकशी केली.
ती मनोरुग्ण असल्याचे कळल्यानंतर रेंजरने तिला सीमा सुरक्षा दलाच्या स्वाधीन केले. नंतर तिला अटकेसाठी गेलेल्या सुनीताला कपिल नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिला अटक केली. सुनीताची पोलीस कोठडी दोन जून पर्यंत होती. पोलीस, गुप्तचर यंत्रणा व दहशतवाद विरोधी पथकाने या काळात तिची कसून चौकशी केली. पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला न्यायालयात हजर केले असता कारागृहात रवानगी झाली. जम्मू-काश्मीर पोलीस नागपुरात आल्यानंतर तिला पुन्हा अटक करण्यात येणार असल्याची माहिती आहे.