HSC paper leak: बारावीचे दोन पेपर फुटले! परीक्षेच्या तासाभरापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल

बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांचे पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपवर आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
HSC paper leak
HSC paper leakfile photo
Published on
Updated on

HSC paper leak

नागपूर: बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांचे पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपवर आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूरमधील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

HSC paper leak
HSC Exam: बारावीच्या फिजिक्स पेपरला 'सामुदायिक कॉपी'; ५८१ विद्यार्थ्यांची उत्तरे एकसारखीच; वाशिममधील धक्कादायक प्रकार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सध्या बारावी (HSC) आणि दहावीच्या (SSC) परीक्षा सुरू आहेत. एकीकडे राज्यभर 'कॉपीमुक्त परीक्षा' राबवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असतानाच, नागपूरमध्ये मात्र बारावीचे दोन पेपर फुटल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

असा उघड झाला प्रकार

गुरुवारी बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर होता. मात्र, परीक्षेपूर्वीच हा पेपर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आला होता. सेंट उर्सुला केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधनगृहात जात असल्याने तेथील पर्यवेक्षकांना संशय आला. महिला शिक्षिकेमार्फत तिची झडती घेतली असता, तिच्याकडे स्मार्टफोन सापडला. तो जप्त करून तपासला असता, एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचे निष्पन्न झाले.

खासगी कोचिंग क्लासचे कनेक्शन

केंद्रप्रमुखांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. संबंधित मोबाईलमध्ये १५ विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करण्यात आला होता. यातील दोन विद्यार्थिनींची चौकशी केली असता, एका खासगी शिकवणी वर्गातील शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती समोर आली आहे. या ग्रुपमधील अन्य १३ विद्यार्थी शहरातील वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा देत होते. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

HSC paper leak
Mumbai news: धक्कादायक! २४ तासांत ४ अल्पवयीन मुली बेपत्ता; नवी मुंबई आणि पनवेलमध्ये खळबळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news