नागपुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; ३ दिवस यलो अलर्ट

Nagpur News
Nagpur News

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरात आज सकाळी १० नंतर अचानक सायंकाळ झाल्यासारखे आकाश काळे, निळे झाले. लगेच काही वेळात विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर जोरदार पावसाने नागपुरातील सखल भाग, वस्त्यांमध्ये पाणीच पाणी झाले.

भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यामध्ये गुरुवारी ९ मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. वादळीवारा, वीज, गारपीट व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. १० ते १२ मे या कालावधीकरीता यलो अलर्ट दिलेला असून या दिवशी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह वादळीवारा व वीज गर्जनेची शक्यता वर्तवलेली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. दुपारी ऊन असले तरी पुन्हा तीन तास मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली आहे. वादळी पावसाने दक्षिण नागपूरसह अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. ठिकठिकाणी झाडे व पोल पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news