Har Ghar Tiranga | 'हर घर तिरंगा' अभियानासाठी नागपूर महापालिकेची तयारी: १ लाख ७५ हजार तिरंगा झेंड्यांचे मोफत वाटप

९ ऑगस्टपासून शहरभर अभियानाला सुरुवात, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा – महापौर निता ठाकरे
Nagpur Municipal Corporation  Free National Flag Distribution
Nagpur Municipal Corporation Free National Flag DistributionPudhari
Published on
Updated on

Nagpur Municipal Corporation Free National Flag Distribution

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या 'हर घर तिरंगा' अभियानाला यंदाही नागपूर महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत शहरात १ लाख ७५ हजार तिरंगा झेंड्यांचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. ९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन महापौर निता ठाकरे यांनी केले.

महानगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर तसेच परिवहन समितीच्या सभापती मंगला खेकरे उपस्थित होत्या.

Nagpur Municipal Corporation  Free National Flag Distribution
Nagpur Ganeshotsav | नागपुरात गणेशोत्सवासाठी 'एक खिडकी' योजना; परवानग्या ऑनलाइन देण्याचे महापौरांचे निर्देश

महापौर निता ठाकरे यांनी सांगितले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाने २०२२ पासून 'हर घर तिरंगा' अभियान सुरू केले आहे. भारतीय राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती करणे, नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना अधिक दृढ करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट करणे हा या अभियानामागील प्रमुख उद्देश आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार यंदा ९ ऑगस्टपासून शहरात 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आमदार निधी आणि नागपूर महानगरपालिकेच्या निधीतून १ लाख ७५ हजार तिरंगा झेंड्यांचे वितरण करण्यात येणार आहे.

Nagpur Municipal Corporation  Free National Flag Distribution
Nagpur news: अल्पवयीन अत्याचार प्रकरणातील दोषींवर होणार कठोर कारवाई; चंद्रशेखर बावनकुळे

या उपक्रमांतर्गत मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल वस्त्यांमधील नागरिकांना तिरंगा झेंड्यांचे प्राधान्याने वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय शहरभर विविध जनजागृती कार्यक्रम, उपक्रम आणि देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक नियोजन पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती महापौरांनी दिली.

'हर घर तिरंगा' अभियानात नागपूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन प्रत्येक घरावर अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहनही महापौर निता ठाकरे यांनी यावेळी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news