नागपूर : गोवंश तस्करी केल्याप्रकरणी चौघांना अटक

file photo
file photo

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरात गोवंश तस्करी करणाऱ्या चौघांना आज (दि.२९) पारडी पोलिसांनी अटक केली. जबलपूर हैदराबाद हायवेवरील शर्मा धाब्याजवळ ही कारवाई करण्यात आली.  इर्शाद उर्फ राजा, अब्दुल सय्यद, शहनाज पाया, बंटी कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी, इर्शाद उर्फ राजा, अब्दुल सय्यद, शहनाज पाया, बंटी कुरेशी हे चौघे संशयित वाहन (क्र. एम एच ४० वाय ९०८२) या वाहनातून तब्बल ३० गायी कत्तलखाण्यात नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आज पारडी पोलिसांनी सापळा रचून जबलपूर हैदराबाद हायवेवरील शर्मा धाब्याजवळ या चौघांना बेड्या ठोकल्या. त्यानंतर या गाईंना गोशाळेत पाठवण्यात आले. यावेळी तब्बल २२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news