नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नुकसान होवून मदत मिळत नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतमालास बाजारात भाव मिळत नाही. कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यानंतर सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही, तर हे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला. Anil Deshmukh