Farmers Diwali In Darkness | शेतकऱ्यांची दिवाळी काळोखात; सरकार अपयशी : वडेट्टीवार

शेतकऱ्यांच्या डोळ्यांतले पाणी, उद्वस्त झालेली घरे आणि थंड पडलेले सरकार यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं आहे.
Farmers Diwali In Darkness
Vijay WadettivarFile Photo
Published on
Updated on

नागपूर : शेतकऱ्यांच्या डोळ्यांतले पाणी, उद्वस्त झालेली घरे आणि थंड पडलेले सरकार यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं आहे. बळीराजाच्या घरात दिवाळीला अंधार असणार असल्याचा संताप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

सप्टेंबर या एकाच महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांची २६ लाख हेक्टरवरील पिकं उद्वस्त झाली आहेत, ५२ लाख हेक्टरवरील खरीप पिकं पाण्यात गेली आहेत. मोडलेल्या बळीराजाला उभं करण्याऐवजी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये सरकार व्यस्त आहे, पक्षाच्या बैठका सुरू आहेत.

Farmers Diwali In Darkness
Nagpur crime news: माजी पोलीस आयुक्तांना बिल्डरने घातला गंडा! बनावट कागदपत्रे वापरून कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न

तोंडावर दिवाळी आली आहे, पण शेतकऱ्याना कोण विचारत आहे. दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत करणार असे सरकार सांगत होते.. अजूनही मदत मिळालेली नाही. कसली दिवाळी? कुठून आणावे गोडधोड पदार्थ, मुलांसाठी कपडे? हे सरकार म्हणजे बडा घर पोकळ वासा आहे.

Farmers Diwali In Darkness
Nagpur OBC Protest | २ सप्टेंबरचा मराठा आरक्षणाबाबतचा जीआर रद्द करा; नागपुरात सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा

किमान हेक्टरी ५० हजारांची मदत केली पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे! दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत झाली तर त्यांच्या आयुष्यात दिवाळी होईल असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news