नागपूर : चिमुकल्यांनी तयार केले पर्यावरणपूरक गणपती

पर्यावरण संवर्धनासाठी चिमुकल्यांसाठी कार्यशाळा
Little Ones engrossed in making an eco-friendly Ganpati
पर्यावरणपुरक गणपती बनवण्यात मग्न झालेले चिमुकलीPudhari Photo
Published on
Updated on

प्रा. राजेंद्र सिंह सायन्स एक्सप्लोरेटरी येथे पर्यावरणपूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा रविवारी (दि.1) आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत विज्ञानाचे विविध प्रयोग करणाऱ्या चिमुकल्यांनी पर्यावरणपूरक आकर्षक गणपती तयार केले.

पर्यावरणपूरक विसर्जनही व्हावे | पुढारी

विद्यार्थ्यांना कलाकार व निवृत्त सहयोगी फॅशन आणि टेक्सटाईल डिझायनिंग, निकालस महिला महाविद्यालय राजश्री बापट यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मातीच्या या मूर्तीमध्ये विद्यार्थ्यांनी तुळशीच्या बियांचा वापर केला. मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यानंतर हे बियाणे जमिनीत लावले जाऊ शकतात.

Little Ones engrossed in making an eco-friendly Ganpati
Ganesh Chaturthi 2024 : पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची यंदा सक्ती नको

या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी एक्सप्लोरेटरीच्या शिक्षक राधिका कायंदे आणि राहुल लांजे यांचे सहकार्य लाभले. यावेळी डॉ. सीमा उबाळे, संचालिका आणि केंद्रप्रमुख रवींद्र जोशी देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शिखा व्यास, शैक्षणिक प्रमुख यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news