Ganesh Chaturthi 2024 : पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची यंदा सक्ती नको

पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची यंदा सक्ती नको
Environment-friendly Ganesha idol should not be forced this year
पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची यंदा सक्ती नको Ganpati File Photo
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पर्यावरणपूरक गणेशमूर्तीसाठी यंदा मुंबई महापालिका आग्रही आहे. परंतु, यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची सक्ती करू नये, असे साकडे मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मुंबई महापालिका प्रशासनाला घातले आहे. यावर आता प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे गणेशोत्सव मंडळांचे लक्ष लागले आहे.

गणेशोत्सव व नवरात्रौत्सवात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे मुंबई महापालिकेचे धोरण आहे. त्यामुळे यंदा घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांकडून बसविण्यात येणाऱ्या पीओपीच्या गणेशमूर्तीना सरसकट बंदी घालण्यात येणार असल्याचे समजते. परंतु, पर्यावरणपूरक गणेशमूर्तीसाठी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची सक्ती करू नये, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आग्रही आहेत.

Environment-friendly Ganesha idol should not be forced this year
Mumbai Cylinder Blast : मुंबईतील चेंबूर कॅम्प परिसरात सिलिंडरचा स्फोट; ९ जण जखमी

याबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व मुंबई महापालिका यांची बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन पर्यावरणपूरक सार्वजनिक पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची यंदा सक्ती नको!

Environment-friendly Ganesha idol should not be forced this year
Mumbai Monsoon | मान्सून मुंबईत दाखल होण्यास पोषक वातावरण

गणेश मूर्तीसाठी सक्ती न करण्याचे निर्देश सरकारकडून मिळण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये घरगुती गणेश मूर्ती शाडूच्या मातीच्याच असाव्यात, असे बंधनकारक करण्यात आले होते. यासाठी शाडूची मोफत मातीही मूर्तीकारांना देण्यात आली होती. यंदाही शाडूच्या मातीचे मोफत वाटप केले जात आहे. त्यामुळे घरगुती गणेश मूर्तींसाठी पीओपीला पूर्णपणे बंदी राहणार आहे. मात्र, सार्वजनिक गणेश मूर्तींचा तिढा सुटलेला नाही. 2023 मध्ये गणेश मूर्तीकारांनी पीओपी गणेश मूर्तीसाठी आग्रही भूमिका घेतली होती. याला राजकीय पाठबळ मिळाल्यामुळे सार्वजनिक गणेश मूर्तींना पर्यावरणपुरक मूर्तींमधून वगळण्यात आले होते.

Environment-friendly Ganesha idol should not be forced this year
Monsoon in Mumbai | ‘या’ दिवशी मान्सून मुंबईत पोहचणार

पर्यायी व्यवस्था करा ! पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची सक्ती करू नये. त्याशिवाय पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा पर्याय सुचवण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचा अहवाल सादर केल्यानंतर याबाबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करून मार्ग काढावा, अशी आमची मागणी आहे.

अॅड. नरेश दहिबावकर, गणेशोत्सव समन्वय समिती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news