हिंदुधर्म संस्कृती संदर्भातील अभ्यासक्रमाला युजीसीची मान्यता आहे का?: ज्ञानेश्वर रक्षक

हिंदुधर्म संस्कृती संदर्भातील अभ्यासक्रमाला युजीसीची मान्यता आहे का?: ज्ञानेश्वर रक्षक
नागपूर, पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात हिंदुधर्म संस्कृती संदर्भात प्रोत्साहन देण्यासाठी मंदिरासोबत करार झाला. या अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान परंपरेचे धडे शिकवणार, अशा बातम्या असताना या अभ्यासक्रमाला युजीसीची मान्यता आहे का?, असा सवाल राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा अभ्यास मंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी उपस्थित केला आहे.
रक्षक म्हणाले की, निश्चितच यामुळे एका धर्माच्या विधी आणि धार्मिक परंपरेचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता येईल. याआधी माजी कुलगुरू डाॅ. विवेक सपकाळ यांच्या काळात गायत्री विद्यापीठासोबत अशाच पद्धतीने करार वसंतराव देशपांडे सभागृहात हजारो उपस्थीतांसमोर करण्यात आला होता. असाच अभ्यासक्रम कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठातही आहे.  पूजाअर्चा रोजगाराचे मोठे साधन होऊ शकते, म्हणून विद्यापीठाने हे पाऊल उचलले असावे. हा अभ्यासक्रम योग्य की अयोग्य हे अभ्यासकांनी ठरवावे.
माझा मुद्दा असा आहे की, हिंदुधर्म संस्कृती मंदिर आणि गायत्री विद्यापीठासोबत ज्या अभ्यासक्रमाचा करार झाला आहे. त्याला युजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता आहे का? विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आणि विद्यापीठ प्रशासनाने  हे जाहीर करावे. आज राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा एम.ए. अभ्यासक्रमाला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना संबधित विषयावर डॉक्टरेट करता येत नाही. या वास्तवाकडे  विद्यापीठाच्या  रक्षक यांनी 'पुढारी'शी बोलताना लक्ष वेधले.

हेही वाचा

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news