Ranbhajya Festival: रानभाज्या अन् पारंपरिक अन्नपद्धतीचे महत्त्व अधोरेखित...;जिल्हास्तरीय महोत्सवात २ लाख ८०० रुपयेची भाजी विक्री

दोन दिवसीय जिल्हास्तरीय रानभाजी व सेंद्रीय उत्पादन विक्री महोत्सवाचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते उद्घाटन
Ranbhajya Festival: रानभाज्या अन् पारंपरिक अन्नपद्धतीचे महत्त्व अधोरेखित...;जिल्हास्तरीय महोत्सवात २ लाख ८०० रुपयेची भाजी विक्री
Published on
Updated on

नागपूर : जिल्हास्तरीय रानभाजी व सेंद्रीय उत्पादन विक्री महोत्सवाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.२ लाख ८०० रुपयांची रानभाजीची विक्री झाली. जागतिक आदिवासी दिनानिमित्त कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नागपूर व कृषी विभाग नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

कृषि राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या पुढाकाराने रामनगर मैदान, नागपूर येथे आयोजित या दोन दिवसीय जिल्हास्तरीय रानभाजी व सेंद्रीय उत्पादन विक्री महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आले. उत्पादक शेतकरी गटांच्या स्टॉलला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी शेतकरी गटांना प्रोत्साहन देत सेंद्रिय शेती, स्थानिक रानभाज्या आणि पारंपरिक अन्नपद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले.

Ranbhajya Festival: रानभाज्या अन् पारंपरिक अन्नपद्धतीचे महत्त्व अधोरेखित...;जिल्हास्तरीय महोत्सवात २ लाख ८०० रुपयेची भाजी विक्री
Roha Ranbhajya Market: पावसाबरोबरच रोह्याच्या बाजारात रानभाज्या दाखल; पावसाळ्यातील आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे साधन

याप्रसंगी जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार श्विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. आत्मा नागपूरच्या प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर श्रीमती प्रज्ञा गोळघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध शेतकरी गटांनी रानभाज्या, नैसर्गिक शेतीमाल, भाजीपाला व अन्य कृषी उत्पादने महोत्सवात विक्रीसाठी आणली होती.

Ranbhajya Festival: रानभाज्या अन् पारंपरिक अन्नपद्धतीचे महत्त्व अधोरेखित...;जिल्हास्तरीय महोत्सवात २ लाख ८०० रुपयेची भाजी विक्री
Festive Season Jobs 2026: गुड न्यूज! सणासुदीच्या काळात नोकऱ्यांचा पाऊस; हंगामी भरतीमध्ये १५ ते २० टक्के वाढीचा अंदाज

महोत्सवातील विशेष आकर्षण ठरलेल्या रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे पौष्टिक गुणधर्म, पारंपरिक उपयोग आणि दैनंदिन आहारातील स्थान याबाबत ६५ शेतकरी गटांनी नागपूर शहरातील नागरिकांशी थेट संवाद साधला. ग्रामीण भागातील शेतकरी आणि शहरातील ग्राहक यांच्यात थेट संपर्क निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळाली.

Ranbhajya Festival: रानभाज्या अन् पारंपरिक अन्नपद्धतीचे महत्त्व अधोरेखित...;जिल्हास्तरीय महोत्सवात २ लाख ८०० रुपयेची भाजी विक्री
Shravan To Diwali Festivals 2026: श्रावणापासून सणांची पर्वणी; गणेशोत्सव, नवरात्र अन् दिवाळीचा जल्लोष

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प उपसंचालक आत्मा श्रीमती पल्लवी तलमले, जिल्ह्यातील सर्व एटीएम, बीटीएम तसेच कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय येळे, बळीराम सातपुते तसेच तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news