Roha Ranbhajya Market: पावसाबरोबरच रोह्याच्या बाजारात रानभाज्या दाखल; पावसाळ्यातील आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे साधन

खेकडे, चिंबोऱ्या आणि रानमेव्याच्या विक्रीने जंगलभागातील कुटुंबांचा उदरनिर्वाह
Roha Ranbhajya Market
Roha Ranbhajya MarketPudhari
Published on
Updated on

रोहा शहर: दडी मारुन बसलेला पाऊस जसा सक्रिय झाला तसे रोह्याच्या बाजारात आता रानभाज्या दाखल होऊ लागलेल्या आहेत. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बदलत्या हवामानानुसार बारमाही नजीकच्या बाजारपेठेत तसेच रहदारीच्या मार्गावर विविध विविध प्रकारच्या वस्तूंची व भाज्यांची विक्री त्यांना आर्थिक बळ देणाऱ्या ठरतात रानभाज्या या रानभाज्या विक्रीमुळे आदिवासी कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो.

उन्हाळ्यात आंबे, काजू, फणस, करवंद, जांभळांसह विविध प्रकारचे रान मेवा म्हणून त्याची देखील मोठ्या प्रमाणात विक्री या आदिवासी महिलाकडून होत असते. पावसाळा सुरु होताच खेकडे, चिंबोऱ्या, मासे, तसेच दरवर्षी जंगलभागात नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणावर रानभाज्या उगवल्या जातात.

या रानभाज्या शोधून तसेच अथक परिश्रम घेत त्यांची खुडणी करून आदिवासी समाजबांधव व महिला ठिकठिकाणी बाजारपेठेत बसून त्यांची विक्री करून दैनंदिन रोजीरोटी सोडवितात.

Roha Ranbhajya Market
Neral Waterlogging: वीस मिनिटाच्या पावसाने नेरळच्‍या नालेसफाईचे पितळ उघडे; परिसर जलमय

साधारणपणे दरवर्षी पाऊस सुरू होतात या रानभाज्या जंगलभागात तयार होण्यास सुरुवात होते यामध्ये शेवळा, टाकळा, भारंगा, कुड्याच्या शेंगा, अलूची पाने, भोक्याची पाने, फणसाच्या बिया व गरे , तळं, कुर्डू, तेरा, टेंभरे, मोह,फुले प तेलपट, कोलू, भोकर, गोखा, भारंगा, काठेगाठ, कुरारा, आदींसह अन्य विविध रानभाज्यांचा समावेश असतो.

सदरच्या रानभाज्या विक्रीतून एका कुटुंबाची रोजीरोटी सूटत असल्याचे आदिवासी महिलांकडून बोलले जाते. या आदिवासी भगिनी करिवणे, तांबडी, चनेरा, घोसाळे, निवी ठाकूर वाडी येथून येऊन भर पावसात बाजारात दिवसभर बसून या भाज्यांची विक्री करून घरी परततात.

तर रोहा शहरातील मुख्य मार्ग हा बारमाही रहदारीचा मार्ग तसेच बाजारपेठ असल्याने येणारे जाणारे पर्यटक देखील या रानभाज्यांना अधिक पसंती देत खरेदी करतात. शारीरिक व्याधीवर पौष्टिक आहार रानभाज्या पचण्यास हलक्या व विविध प्रकारच्या शारीरिक व्याधीवर पौष्टिक आहार असून, जीवन सत्वात उत्तम तसेच या भाज्या रामबाण ठरत असल्याने आयुर्वेदात या भाज्यांची खूप महती आहे.

तसेच नैसर्गिकरीत्या या रानभाज्या पावसाळ्यात तयार होत असल्याने या भाज्या ग्राहकांच्या देखील पसंतीस उतरतात. पावसाळ्यात वा भाज्यांना फारच मोठी मागणी असल्याने त्यावर आपला उदार निर्वाह म्हणून आदिवासी बांधव दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news