Vijay Wadettiwar : काँग्रेसच्या 23 नगरसेवकांना 5 लाख देऊन पळवून नेले, वडेट्टीवार यांचा आरोप !

पूर्व विदर्भातील काँग्रेसचे २३ नगरसेवक सध्या नॉट रिचेबल
 Vijay Wadettiwar  statement
काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार (Pudhari Photo)
Published on
Updated on

Congress's 23 Corporators Abducted After Being Paid ₹5 Lakhs: Wadettiwar Alleges!

नागपूर : राजेंद्र उट्टलवार पूर्व विदर्भातील काँग्रेसचे २३ नगरसेवक सध्या नॉट रिचेबल असून त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा ॲडव्हान्स देऊन भाजपने पळवून नेल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

 Vijay Wadettiwar  statement
Vidhan Parishad Election 2026 | विधान परिषद निवडणुकीआधी वडेट्टीवारांना धक्का, पूर्व विदर्भातील काँग्रेसचे नगरसेवक 'नॉट रिचेबल'

सत्ता आणि पैशाच्या मस्तीत मग्रूर झालेल्या भाजपने महाराष्ट्रात लोकशाहीचा लिलाव मांडला असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील या सर्व विकल्या गेलेल्या लोकप्रतिनिधींवर व्हीप जारी करून त्यांना अपात्र करण्याची कायदेशीर प्रक्रिया काँग्रेस पक्ष तातडीने सुरू करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वडेट्टीवार यांनी भाजपच्या सत्तेचा गैरवापर, घोडेबाजार आणि राज्यातील शेतकरी संकटावर कडाडून टीका केली. ठेकेदारच भाजपचे आमदार झाल्याने पैशाची मस्ती कशी येते, हे चंद्रपूरमध्ये सुरू असलेल्या घोडेबाजारावरून दिसते आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांना ५ लाख रुपये देऊन उचलण्यात आले असून, काँग्रेस जितके देईल त्याच्या डबल देऊ असे आमिष भाजप कडून दाखवले जात आहे. याचे सर्व रेकॉर्ड्स आणि पुरावे आहेत. राज्यात भाजपची सत्ता नसती, तर एकाही नगरसेवकाची पक्षांतर करण्याची हिंमत झाली नसती, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. वेळ आल्यावर सगळे पुरावे मांडू असा इशाराही दिला.

 Vijay Wadettiwar  statement
Chandrapur Mayor Election : बहुमत असूनही काँग्रेसचे चंद्रपुरात ‘पानिपत’, उबाठाला गृहीत धरणे पडले महागात

मग सर्व जागांबाबत करा चर्चा

नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याच्या भाजपच्या भूमिकेवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, जर ही निवडणूक बिनविरोध करायची असेल, तर केवळ एका जागेवर नाही, तर सर्वच्या सर्व जागांवर भाजपने चर्चा करावी. आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षात वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीनही जिल्ह्यांतून उमेदवारांची नावे आली असून, पुढील एक-दोन दिवसांत महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार निश्चित केला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news