Vidhan Parishad Election 2026 | विधान परिषद निवडणुकीआधी वडेट्टीवारांना धक्का, पूर्व विदर्भातील काँग्रेसचे नगरसेवक 'नॉट रिचेबल'

पक्षाचा व्‍हीप झुगारुन जाणार्‍यांवर कारवाई होणार : वडेट्टीवारांची स्‍पष्‍टोक्‍ती
Vidhan Parishad Election 2026
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार.Pudhari
Published on
Updated on

Vidhan Parishad Election 2026

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक (Vidhan Parishad Election 2026) जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार जाहीर झालेले नसताना पूर्व विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील ६० पेक्षा अधिक काँग्रेस नगरसेवक सध्या 'नॉट रिचेबल' असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.दरम्‍यान, राज्‍यात आता फोडाफोडीचा उत्‍सव सुरु झाला आहे, असा आरोप करत पक्षाचा व्‍हीप झुगारुन जाणार त्‍यांच्‍यावर कारवाई होणार, असे वडेट्टीवारांनी आज माध्‍यमांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

काँग्रेसचे ३०० पेक्षा अधिक नगरसेवक पूर्व विदर्भातील

काँग्रेसचे ३०० पेक्षा अधिक नगरसेवक पूर्व विदर्भात आहेत. आता यातील ६० नगरसेवक 'नॉट रिचेबल' असल्याने काँग्रेससाठी आणि काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Vidhan Parishad Election 2026
Parbhani Hingoli MLC Election : विधान परिषदेसाठी ‌‘हापूस बॉक्स पॅटर्न‌’चर्चेत!

नगरसेवक सहलीवर गेल्याची चर्चा

अलीकडेच विजय वडेट्टीवार आपल्या मुलीच्या विवाह समारंभात व्यस्त होते. आजवर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे बहुतांश समर्थक विविध ठिकाणी सहलीला गेल्याचे, तसेच भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Vidhan Parishad Election 2026
Vidhan Parishad elections Maharashtra : पुणे विधान परिषदेची जागा भाजपलाच मिळावी!

भाजपकडून विधान परिषदेसाठी अरुण लखानी यांच्या नावाची चर्चा

भाजपकडून उद्योजक अरुण लखानी यांचे देखील नाव उमेदवारीसाठी गेल्या काही दिवसांत भाजप वर्तुळात जोरात चर्चेत आहे. लखानी यांच्‍या मुलाचा विवाह खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलीशी निश्चित झाला आहे.

Vidhan Parishad Election 2026
Shekap Panvel Politics: रायगडचा ‌‘लाल बालेकिल्ला‌’ कोसळला?

१८ जून रोजी मतदान, २२ जून रोजी मतमोजणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. अद्याप उमेदवार निश्चित झालेले नसताना नगरसेवकांची ही पळवापळवी, यावरून ही निवडणूक यावेळी देखील मोठी चुरशीची आणि मोठ्या आर्थिक व्यवहाराची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news