Dharmaraobaba Atram : लोकसभेला काँग्रेसची एकही जागा निवडून येणार नाही : धर्मरावबाबा आत्राम

Dharmaraobaba Atram : लोकसभेला काँग्रेसची एकही जागा निवडून येणार नाही : धर्मरावबाबा आत्राम
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आम्हाला राज्यातील सर्व 48 जागा निवडून आणण्यासाठी कामाला लागायचे आदेश दिलेत. काँग्रेसला एकही जागा सोडणार नाही. गेल्यावेळी चंद्रपूरची एक जागा निवडून आली होती. आता ती पण जागा खेचून घेणार, असा इशारा देतानाच महाविकास आघाडीची आता झोपायची वेळ आली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज (दि.२४) केली. रविभवन येथे आयोजित जनता दरबारानंतर ते माध्यमांशी बोलत होते. Dharmaraobaba Atram

आमदार रोहित पवार यांच्यावरील  कारवाई संदर्भात छेडले असता, त्यांनाच काय कुणालाही सूडबुद्धीने नोटीस दिलेली नाही. ईडीची कारवाई योग्य आहे की नाही ते लवकरच कळेल. त्यांनी वाईट केलेले नाही तर मग घाबरायच कशाला? उलट सहानुभूती मिळते का? यासाठी ते प्रयत्न करत आहेत. विरोधक असतील, पण अजित पवारांचे ते नातेवाईक देखील आहेत, काही पुरावा सापडला असेल म्हणून तपासासाठी त्यांना बोलावले असेल. Dharmaraobaba Atram

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचे सरकार आल्यावर तुमच्यावरही कारवाई करू, असा इशारा दिला. याबाबत बोलताना आता त्यांचे सरकार येईल, हे स्वप्नच त्यांनी पाहावे. पण आम्ही 200 पार जाणार आहोत. तीनही पक्ष बसून जागावाटपाचा योग्य निर्णय घेतील. महायुतीच्या जागा निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार असून आमचे दिलेले टार्गेट कमी होणार नाही. त्याकरिता आम्ही काम करत आहोत, असे आत्राम म्हणाले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news