

नागपूर - लोकसभा, विधानसभेचे निकाल पाहता मनपा निवडणूक पूर्व तयारी म्हणून काँग्रेसने आज गुरुवारी देवडिया काँग्रेस भवनात आढावा बैठक घेतली. प्रदेशकडून आलेले निरिक्षक माजी मंत्री रणजीत कांबळे यांनी यावेळी काही ब्लॉक अध्यक्ष बिलकुल काम करताना दिसत नाहीत. शेवटी तो माणूस कोणाचाही असो त्यांनी पक्षाचे काम केलेच पाहिजे. जर होत नसेल तर त्यांनी पदावर राहू नये. जिल्हाध्यक्षांनी योग्य ते पाऊल उचलावे, पक्षासाठी काय करता येईल ते प्रत्येकाने सांगा विषयांतर करू नका या शब्दात कान टोचले. भाजपसोबतच काँग्रेस मध्येही संघटन मजबुती, शहर, जिल्हा अध्यक्ष बदलाचे वारे जोरात आहे.
विरोधी पक्षनेते राहूल गांधीनी संसदेमध्ये वारंवार जातिनिहाय जनगणना व्हावी. यासाठी वारंवार आवाज उठवला, त्याची परिनिती म्हणून मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला यासाठीचा प्रस्ताव शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी मांडला सूचक म्हणून आमदार अभिजीत वंजारी व अनमोदक म्हणन प्रा दिनेश बानाबाकोडे होते.
सर्वप्रथम पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात 28 निष्पाप लोकांचा बळी गेला त्यांना श्रध्दाजंली वाहण्यात आली. प्रास्ताविकात शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी गेल्या 11 वर्षात शहरात पक्ष संघटनेला बळकट करण्याचे काम केले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट दिली. आपण यापूर्वीच शिर्डी अधिवेशनात राजीनामा दिला, पक्ष जो निर्णय घेतील तो मान्य राहील असे सांगितले. मात्र, पक्ष संघटन मजबुत करावयाचे आहे. अध्यक्ष बदलणार नाही अशी ग्वाही निरीक्षकांनी दिली. प्रत्येक ब्लॉक अध्यक्षासोंबत बंदद्वार चर्चा करुन प्रत्येक ब्लॉकचा आढावा घेतला.
बैठकीला आमदार अभिजीत वंजारी, माजी मंत्री अनीस अहमद, प्रदेश महासचिव विशाल मुत्तेमवार, महासचिव अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, सचिव कमलेश समर्थ, संदेश सिंगलकर, हैदरअली दोसानी, गिरीश पांडव, माजी नगरसेवक प्रशांत धवड, संजय महाकाळकर, प्रा. दिनेश बानाबाकोडे, उपाध्यक्ष किशोर कन्हेरे, सेवादल अध्यक्ष प्रविण आगरे, रमेश पुणेकर, नितीन साठवणे, प्रामुख्याने उपस्थित होते.