नागपूर: पुढारी वृत्तसेवा : नागपूरच्या इतिहासात प्रथमच नागपूरच्या एका खेळाडूने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविण्याचा विक्रम केला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.६) ओजस देवतळेच्या आई-वडिलांशी संवाद साधून आनंद व्यक्त केला. आणि त्यांचे कौतुक केले.
आशियाई गेम्समध्ये नागपूरच्या ओजस देवतळे यांने बुधवारी आर्चरी मिक्स टीम कपांऊंड इव्हेंटमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. यासोबतच गुरूवारी आर्चरी मेन्स कंपाऊंड टीम इव्हेंटमध्ये सुद्धा भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
त्याच्या या यशाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे कौतुक केले. ओजसचे वडील प्रवीण देवतळे आणि आई अर्चनाताई देवतळे यांच्याशी दूरध्वनीवर संभाषण साधत त्यांचे अभिनंदन केले. ओजस त्याच्या आगामी तिसर्या इव्हेंटमध्ये सुद्धा सुवर्णपदक मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा