नागपूर : नागपूरमध्ये गेल्या 48 तासांमध्ये 40 हून अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील बहुतांशी रुग्ण हे अखेरच्या क्षणी सरकारी रुग्णालयात रेफर केलेल्यांपैकी असल्याने नेमके मृत्यू कशामुळे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) ही दोन सर्वात मोठी रुग्णालये आधार आहेत. या रुग्णालयांवर नागपूर विदर्भासोबतच शेजारच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगना या प्रांतातून येणार्या रुग्णांचा भार असतो. दरम्यान, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी आढावा घेतला. येथे येणारे रुग्ण अत्यवस्थेत येतात, असे ते म्हणाले.