नागपूर : खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात डॉक्टर संघटनेचे आंदोलन | पुढारी

नागपूर : खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात डॉक्टर संघटनेचे आंदोलन

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड येथील शासकीय रुग्णालयाचे डीन यांना संडास साफ करायला लावल्याने डॉक्टर संघटना आक्रमक झाली आहे. आज नागपूर मेडीकल कॉलेजमधील डॉक्टर संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. देव म्हणूण नाही, तर माणूस म्हणून तरी वागणूक द्या.अशा आशयाचे फलक हातात घेऊन डॉक्टरांनी खासदार हेमंत पाटील यांचा निषेध केला. खासदार हेमंत पाटील यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि पुढे अशा घटना घडता कामा नये याची सरकारने काळजी घ्यावी, अन्यथा आंदोलन आक्रमक करुन काम बंदची हाक दिल्या जाईल, असा इशारा आंदोलक डॉक्टरांनी दिला आहे.

Back to top button