Nagpur NCP | अंभोरा येथील पवित्र संगमावर अजितदादांच्या अस्थीचे विसर्जन; हजारोंच्या उपस्थितीत लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप

Ritual immersion of Ajit Pawar | 'अजितदादा अमर रहे' च्या घोषणा आणि जड अंतःकरणाने हजारो नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप
Ajit Pawar Asthi Visarjan Nagpur
अजित पवार यांच्या पवित्र अस्थींचे वैनगंगा, कन्हान आणि आम नदीच्या त्रिवेणी संगमावर विसर्जन करण्यात आले.Pudhari
Published on
Updated on

Ajit Pawar Asthi Visarjan Nagpur

नागपूर : लोकनेते अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थींचे आज (दि.३) मौदा तालुक्यातील अंभोरा येथील वैनगंगा, कन्हान आणि आम नदीच्या त्रिवेणी संगमावर अत्यंत भावूक वातावरणात विसर्जन करण्यात आले. 'अजितदादा अमर रहे' च्या घोषणा आणि जड अंतःकरणाने हजारो नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

नागपुरातील गणेश पेठ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयापासून या विसर्जन यात्रेला सुरुवात झाली. यात्रेत अनेक वाहनांचा ताफा आणि समर्थक सहभागी होते.

Ajit Pawar Asthi Visarjan Nagpur
Ahilyanagar Ajit Pawar Condolence: अहिल्यानगरमध्ये सर्वपक्षीय शोकसभा; स्व. अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली

आग्याराम देवी चौक, गांधी सागर, चिटणीस पार्क, बडकस चौक, सी.ए. रोड, वर्धमान नगर आणि वाठोडा अशा विविध भागांतून जात असताना नागपूरकरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लाडक्या नेत्याच्या अस्थींचे दर्शन घेतले. अनेक प्रमुख चौकांमध्ये अस्थिकलशावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि स्थानिक नागरिकांनी अस्थिकलशाचे पूजन करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

विसर्जन यात्रा शहर व नागपूर ग्रामीण येथे ठिकठिकाणी जनसमुदायाचे प्रेम स्वीकारत सायंकाळी अंभोरा येथील पवित्र त्रिवेणी संगमावर पोहोचली. यानंतर वैदिक मंत्रोच्चारात अस्थी विसर्जन विधी पार पडला. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, ग्रामीण अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे व कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर,जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी विधीवत पूजन केले.

Ajit Pawar Asthi Visarjan Nagpur
Ajit Pawar Memorial Baramati: अजित पवारांच्या अंत्यस्थळी शरद पवार यांची भावूक भेट

नगरसेविका आभा पांडे, प्रशांत पवार, सुनीता येरणे, विशाल खांडेकर, बजरंगसिंह परिहार, चंद्रपाल चौकसे, तानाजी वणवे, बाबा गुजर दुनेश्वर पेठे , नरेश अरसडे, राजू राऊत, प्रविण कुंटे, राजू नागुलवार, रमण ठक्कर, मुकेश रेवतकर, रेखा चरदे, कल्ला नायक व पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपल्या लाडक्या लोकनेत्याला श्रद्धांजली अर्पण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news