Agniveer government jobs Maharashtra|अग्निवीरांना शासकीय नोकरीत थेट संधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

अग्निवीरांना शासकीय नोकरीत थेट संधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
Devendra Fadanvis
Devendra FadanvisPudhari
Published on: 
Updated on: 

नागपूर : अतिशय खडतर प्रशिक्षण घेत तयार झालेल्या देशासाठी लढणार्‍या अग्निवीरांना शासकीय नोकरीत थेट संधी दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. हे आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही राज्य मंत्रिमंडळात घेतला होता. त्यानुसार, नियमात आवश्यक ते बदल करुन आता 282 अग्निवीरांना नियुक्ती देण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

Devendra Fadanvis
Nagpur Borewell Ban | नागपूर जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर बंदी

केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असलेल्या 282 नौदल अग्निवीरांची पहिली यादी राज्य सरकारला प्राप्त झाली होती. त्यानुसार, 150 खलाशी डेकसाईड आणि 132 खलाशी इंजिनसाईड अशा 282 अग्निवीरांना पोलिस शिपाई म्हणून आज नियुक्ती देण्यात आली आहे आणि तसे आदेशही त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. इतरांना सैन्य दल आणि पोलिस सेवेत सामावून घेतले जाणार आहे असेही स्पष्ट केले.

Devendra Fadanvis
Nagpur water shortage: पाणीटंचाईच्या संकटामुळे ९०० कोटींच्या रस्ते कामांना ब्रेक; नागपूर महापालिकेचा निर्णय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news