Nagpur water shortage: पाणीटंचाईच्या संकटामुळे ९०० कोटींच्या रस्ते कामांना ब्रेक; नागपूर महापालिकेचा निर्णय

उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करण्यासोबतच पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने सुमारे ९०० कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांना तात्पुरता ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे.
Nagpur cement concrete roads
Nagpur cement concrete roadsFile Photo
Published on: 
Updated on: 

Nagpur water shortage

नागपूर : यंदा नागपूर जिल्ह्यात अपुरा पाऊस झाल्याने पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करण्यासोबतच पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने सुमारे ९०० कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांना तात्पुरता ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. पाचव्या टप्प्यातील रस्ते काँक्रीटीकरणाची कामे स्थगित करण्यात आल्याने शहरातील नियोजित रस्ते विकासाची कामे पुढे ढकलली जाणार आहेत.

महापालिकेने सुरुवातीला शहरातील १३५ रस्त्यांची काँक्रीटीकरणासाठी निवड केली होती. त्यानंतर आमदार आणि नगरसेवकांनी सुचविलेल्या रस्त्यांचा समावेश केल्याने ही संख्या २६५ पर्यंत पोहोचली. या टप्प्यात एकूण ९००.२२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या कामांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासणार असल्याने सद्यस्थितीत ही कामे थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Nagpur cement concrete roads
Nagpur Borewell Ban | नागपूर जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर बंदी

१८ वर्षांतील सर्वात कमी पावसाची नोंद

यंदा नागपूर जिल्ह्यात गेल्या १८ वर्षांतील सर्वात कमी पावसाची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच धरणांमधील जलसाठा सुमारे ५८ टक्क्यांवर असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. पाण्याची वाढती गरज आणि संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

पाणी बचतीला प्राधान्य

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अनावश्यक वापर रोखण्यासाठी महापालिकेकडून दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम ठेवणे आणि नागरिकांना आवश्यक पाणी मिळावे, यासाठी उपलब्ध जलसाठ्याचा जपून वापर करण्यावर भर दिला जात आहे.

रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागणार असल्याने सध्या या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासकामांपेक्षा पाणी बचत आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन यांना महापालिकेने प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. पावसाची स्थिती आणि जलसाठ्याचा आढावा घेतल्यानंतर या कामांबाबत पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Nagpur cement concrete roads
Nagpur News : फॉरेस्ट ऑफिस चौक ते आरबीआयकडे जाणारा ८० मीटर रस्ता बंद करण्याचा प्रस्ताव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.